Top Post Ad

सगळे उद्योग गुजरातमध्ये जात आहेत... तुम्ही आमच्या पैशावर जगता

 

तुम्ही कोणाच्या भाकरी खात आहात? तिथे टाटा-बिर्ला आहेत? तुम्ही आमच्या पैशावर जगता. तुम्ही किती टॅक्स भरता? तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत? आमच्याकडे खाणी आहेत,  झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशाकडे आहेत खाणी! तुमच्याकडे खाणी आहेत का? सगळे उद्योग गुजरातमध्ये जात आहेत. सेमी कंडक्टरचा उद्योग गुजरातमध्ये आहे. हिंदी भाषिकांना मारहाण करता मग इतर भाषिकांना का मारहाण करत नाहीत? ऊर्दू, तमिळी, तेलगु लोकांना मारहाण करा ना. स्वत:च्या घरात आहात तेव्हा मोठे बॉस आहात. या बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, तामिळनाडूमध्ये या तिथे तुम्हाला आपटून आपटून मारु. आम्ही मराठीचा सन्मान करतो. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचा आम्ही सन्मान करतो. मराठीचा सन्मान करतो. भारताला स्वातंत्र्य करण्यामध्ये मराठी स्वातंत्र्यसैनिकांचं मोठं योगदान आहे. आम्ही सर्वांचा सन्मान करतो,"  भारतीय जनता पार्टीचे खासदार निशिकांत दुबे

भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या विधानाचा निषेध करत मुंबई काँग्रेस अध्यक्ष, खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, निशिकांत दुबे हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असताता आता ते मराठी व महाराष्ट्रावर घसरले आहेत. मुंबई व महाराष्ट्रात उत्तर भारतातील लोक आपल्या रोजीरोटीसाठी येतात व त्यातील अनेक येथेच वास्तव्य करून आहेत. मुंबई व महाराष्ट्राने सर्वांनाच सामावून घेतले आहे. उत्तर भारतीयांसह अनेक प्रांतातील लोकांचा आधार मुंबई व महाराष्ट्र आहे. देशाच्या कर संकलनात ४० टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे हे दुबेंना माहित नसावे. त्यामुळे कोण कोणाला पोसतो हे दुबेंनी डोळे उघडून पहावे. हिंदी सक्तीचे दोन शासन आदेश रद्दे केले असले तरी हा वाद अजून संपलेला नाही. भारतीय जनता पक्षाचे नेते जाणीवपूर्वक मराठी भाषा व मराठी माणूस व महाराष्ट्राचा अपमान करत आहे. दुबे सारख्या नाठाळांचा बंदोबस्त भाजपाने करावा तसेच त्यांच्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्रातील लोकांना महाराष्ट्राबाहेर आपटून मारू या दुबे यांचे विधान अत्यंत आक्षेपार्ह असून त्यांना हा अधिकार कोणी दिला असा संतप्त प्रश्न विचारून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा करावा , अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com