Top Post Ad

मुंबई रेल्वेचा मनमानी कारभार... रेल्वे स्थानक डोंबिवली पण डोंबिवली नावच गायब

गेल्या वर्ष भरा पासून डोंबिवली स्थानकाचे नूतनीकरण, डागडूजी, प्लेटफॉर्म रुंदीकरण, वाढीव जिना, सरकते जिने पत्र्याचे शेड असे अनेक काम सुरू आहेत. सदर नूतनीकरनाचे आणि सुशोभीकरणाचे काम करत असताना रेल्वे प्रशासना कडून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे जणू नव्याने नामकरण केले आहे. सदर स्थानकाला पुर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूला एकूण आठ प्रवेश द्वार आहेत, परंतु सदर एकाही प्रवेश द्वारावर कुठेच डोंबिवली नावाचा उल्लेख नाही म्हणुन नागरिकांच्या आणि मुख्यतः बाहेरून आलेल्या प्रवाशांच्या मनात गोंधळ निर्माण होतो की आपण नक्की कोणत्या स्थानकावर आहोत. सदर आठही प्रवेश ‌द्वारा वर नाट्यनगरी, नृत्यनगरी, क्रिडा नगरी, साहित्य नगरी, उ‌द्योग नगरी, संगीत नगरी, एकता नगरी, कला नगरी लिहिलेली नावे ही डोंबिवली शहराला मिळालेल्या उपमा आहेत. उपमा मिळाल्या म्हणून आपण मूळ नाव मिटवू शकत नाही. 

त्याकरिता ज्येष्ठ शिवसैनिक स्टेट बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते सुभाष शंकर महाजन यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना उपशहर प्रमुख डोंबिवली तथा कक्ष जिल्हा प्रसारक ठाणे ग्रामीण प्रमोद गोपीनाथ कांबळे यांनी भारतीय मध्य रेल्वे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) हिरेश मीना यांच्या कार्यालयात भेट घेतली होती. त्यावेळी संबंधित अधिकारी वरिष्ठ मंडळ विद्युत इंजिनियर शांती लाल यांच्या सोबत चर्चा करून त्यांना निवेदन दिले होते. आणि लवकरात लवकर आपण डोंबिवली स्थानकाच्या बाहेरील कमानीवर डोंबिवली हे मुळ नाव सुद्धा लिहावे, तसेच अनेक दिवसापासून रेंगाळत चाललेली कामे लवकरात लवकर पूर्णत्वास आणावी असे विनंती करून सांगितले अन्यया शिवसेना स्टाइल से तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात होता 

परंतु आजतागायत यावर कोणती दखल घेतली गेली नाही.. निवेदन देऊन  दोन महिने झाले आहे तरीदेखील रेल्वे प्रशासना कडून कोणतीच दखल घेतली गेली नाही याबद्दल डोंबिवलीकर प्रचंड संताप व्यक्त करीत आहेत. डोंबिवली मधील नागरिकांच्या कला गुणाने आणि स्वकर्तुत्वाने डोंबिवली नक्कीच कला नगरी, क्रीडा नगरी, नाट्य नगरी, साहित्य नगरी, उ‌द्योग नगरी, एकता नगरी, संगीत नगरी, नृत्य नगरी आहेच परंतु डोंबिवली असलेले मुळ नाव गायब करणे म्हणजे ही रेल्वे प्रशासनाची मनमानी झाली. सदर बाब प्रशासनाच्या लक्षात आणून देण्या करिता दिनांक २८/११/२०२५ रोजी पुन्हा प्रमोद मुक्ताबाई गोपीनाथ कांबळे डोंबिवली उपशहर प्रमुख तथा कक्ष जिल्हा प्रसारक ग्राहक संरक्षण कक्ष ठाणे जिल्हा (ग्रामीण)  यांच्याकडून रेल्वे प्रशासनाला स्मरण पत्र देण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com