नेर... घरातील प्रत्येक व्यक्ती ला शिवणकला येणे गरजेचे आहे कारण शिवणकला व्यक्तीला स्वाभिमान शिकविते असे प्रतिपादन बडनेरा येथील साधना नभोवाणी चे समन्वयक प्रा. संजय घरडे यांनी केले ते नेर तालुक्याच्या टोकावर असलेल्या दाभा येथे एका कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष दारव्हा पंचायत समिती च्या कानिष्ठ आरेखक वनिताताई इंगोले होत्या तर प्रमुख अतिथी महाराष्ट्र रत्न फुले शाहू आंबेडकर ग्रुप चे संस्थापक वृषभ मेश्राम जिल्हा उद्योग केंद्र यवतमाळच्या नेर येथील कार्यक्रम अधिकारी श्रद्धाताई सोईतकर होत्या
दाभा येथील सामाजिक भवनामध्ये गेल्या एक महिन्यापासून जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत व जिल्हा उद्योजकता विकास केंद्र यवतमाळ द्वारे आयोजित आणी वनिता बहुउद्देशीय ग्रामोद्दयोग महिला मंडळ शिरजगांव पांढरी च्या सहयोगाने टेलरिंग प्रशिक्षण कार्यक्रम सूरू होता त्याचा समारोप नुकताच संपन्न झाला याप्रसंगी बोलताना प्रा, घरडे म्हणाले कीं शिवणकले मुळे स्त्रिया आत्मनिर्भर होते या आत्मनिर्भरतेमधून स्त्रियांमध्ये स्वतः चे काम स्वतः करण्याची प्रवृत्ती निर्माण होऊन त्या स्वाभिमानी बनतात त्या मुळे शिवण कले सोबतच सर्वच कला मनापासून आत्मसात करा असे आवाहन घरडे सरांनी केले या प्रशिक्षनाला जिल्हा उद्योजकता विकास केंद्र यवतमाळ चे प्रमुख रुपेश हिरुळकर कांबळे सर बाभुळगाव येथील सामाजिक कार्येकर्ते दिलीपभ वाघमारे डेहनी येथील विलासराव अर्जुने कवी अतुलकुमार ढोणे यांनी भेटी दिल्या
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शरद मोरे प्रास्ताविक प्रशिक्षिका शीतल शेंडे व आभार प्रदर्शन अस्मिताताई बनसोड यांनी केले कार्यक्रमला मोठया प्रमाणात महिलांची उपस्थिती होती

0 टिप्पण्या