Top Post Ad

धारावीत एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला...आचारसंहिता फक्त विरोधकांनाच?

धारावी प्रभाग क्र183 राहुल शेवाळे यांच्या वहिनी  शेवाळे वैशाली नवीन यांच्या मतदार संघात काल महाराष्ट्र राज्याचे  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराकरिता धारावीत आले होते. रोड शो च्या माध्यमातून हा प्रचार सुरू होता. मात्र प्रचाराची वेळ संपल्यानंतरही हा रोडशो सुरू होता हे लक्षात आल्यावर इतर उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी याला जोरदार आक्षेप नोंदवला. यावेळी  शेवाळे वैशाली नवीन  वगळता सर्वच उमेदवांनी आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे ताफ्यासमोरच निदर्शने सुरू केली. जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा अडवल्यानं मोठा गदारोळ झाला. प्रचाराची वेळ संपल्यानंतरही उपमुख्यमंत्री धारावीत आल्याचा आरोप करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जोरदार विरोध केला. आमदार ज्योती गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. आचारसंहितेच्या नियमांवरून कार्यकर्त्यांनी पोलिसांना धारेवर धरले. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपमुख्यमंत्र्यांनी आपला दौरा अर्धवट सोडला. 

आचारसंहिता फक्त विरोधकांनाच सत्ताधाऱ्यांनी हुकूमशहाप्रमाणे वागावे का असा सवाल यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांना विचारला. मात्र पोलिस यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत होती. आम्ही वारंवार प्रचाराकरिता परवानग्या काढायच्या त्या परवानग्याही पोलिस वेळेवर देत नाही. शिवाय आमच्या मागे पोलिसांचा कायमचा ससेमिरा सुरू असतो. वेळ संपली की बॅनर काढा येथेच थांबा बंद करा असे हुकूम सोडतात. प्रचारादरम्यान दडपशाही करण्याचाही प्रयत्न होतो. इतकेच काय महापालिका देखील कायम आमच्या कार्यालयावर येऊन एकच बँनर लावा एकच झेंडा लावा याचे परमिशन घेतले काय त्याचे काय असा सवाल करीत असतात. असा तऱ्हेने सत्ताधाऱ्यांना मोकळे रान देत हे प्रशासन सर्वसामान्यांना घाबरवत असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com