Top Post Ad

त्या अग्नीमधून सुद्धा पोचीराम कांबळे जय भीम बोलायचा

 नामांतराचा लढा...

ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जगाच्या कानाकोपऱ्यात मध्ये ज्ञानाच प्रतीक म्हणून ओळखले जाते. कोलंबिया विद्यापीठाने त्यांच्या इथे शिकून गेलेल्या सर्वात हुशार विद्यार्थ्यांची यादी केली होती.त्या यादीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पहिल्या क्रमांकावर होत ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.पण दुर्दैव या गोष्टीच वाटते की त्याच महामानवाच आपल्या देशामध्ये मान सन्मान होताना दिसत नाही. त्याच महामानवाचं मराठवाड्याच्या विद्यापीठाला नाव देऊ नये म्हणून इथल्या सवर्ण जनतेने विरोध केला होता . कारण ते खालच्या जातीतले होते  म्हणून विद्यापीठाला  बाबासाहेबांच नाव देण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी तब्बल 16 वर्षे लढावे लागले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मुंबईला सिद्धार्थ कॉलेज ची स्थापना केली आणि मराठवाड्यामध्ये 1950 ला औरंगाबाद येथे मिलिंद कला महाविद्यालय स्थापन केल त्यामुळे शिक्षणाची गंगोत्री मराठवाड्यामध्ये आली. नाहीतर मराठवाड्याच्या तरुणाला उच्च शिक्षणासाठी एक तर हैदराबाद किंवा पुणे-मुंबईच्या ठिकाणी जावे लागत होत.बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या मिलिंद कॉलेज मुळे मराठवाड्याचा विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकले. त्यामुळे साहजिकच आहे की मराठवाड्याच्या आंबेडकरी अनुयायांनी विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे अशी मागणी केली.

विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच नाव देण्याची पहिली मागणी विद्यापीठचे बांधकाम सुरु असताना 1957ला करण्यात आली होती. मराठवाडा विद्यापीठाची स्थापना 23 ऑगस्ट 1958 ची आहे. त्यानंतर मिलिंद कॉलेजचे प्राचार्य एसटी प्रधान यांनी 1966 ला  मागणी केली होती. त्यानंतर आंबेडकरी जनतेने जोर धरला विद्यापीठाला नाव द्यावे म्हणून ठीक ठिकाणी आंदोलने झाली. विद्यार्थी कृती समितीने अनेक मोर्चे आंदोलने केली. गंगाधर गाडे असतील दलित पॅंथरचे अनेक नेत्यांनी याबाबत आक्रमक धोरण स्वीकारलं होतं. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी तर नागपूर ते औरंगाबाद असा लॉंग मार्च काढला होता.परंतु तत्कालीन सरकारने या मोर्चावर लाठीचार्ज केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि भीमसैनिकांना जेलमध्ये दाबण्याच काम केलं.

 यामध्ये दोन गट पडले होते एक विद्यापीठाला बाबासाहेबांच नाव द्यावे म्हणून तर दुसरा गट त्या नावाला विरोध करणारा मराठवाडा विद्यापीठाला मौलाना अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे म्हणून मुस्लिम समाजाने सुद्धा मागणी केली होती तर सवर्ण लोकांनी स्वामी दयानंद सरस्वती यांचे नाव द्यावी म्हणून मागणी केली होती. 23 जुलै 1978 ला राज्याच्या  दोन्ही सभागृहांमध्ये मराठवाड्याच्या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सहमत करण्यात आला . परंतु या निर्णयामुळे जे या नामांतराला विरोध करत होते ते अधिकच उग्र झाले.नामांतराची ठिणगी फक्त शहरापुरती मर्यादित राहिली नाही मराठवाड्याच्या गाव खेड्यामध्ये ती पोहोचली होती. आणि तिने जातीय स्वरूप घेतलं होतं.

मराठवाड्यातल्या सरंजामशाही आणि जातिवादी लोकांनी बौद्ध समाजाचे घरे जाळण्याचे काम केलं त्यांना मारहाण केली. कित्येक निष्पाप लोकांना मारण्यात आलं.त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला तरी भीमसैनिक मागे हटला नाही. एकाबाजूला बाबासाहेबांच्या नावाचा विरोध करणारे तर दुसऱ्या बाजूला त्याच नावासाठी आपला जीव देणारे कितीतरी भीमसैनिक उभे होते. हा प्रचंड विरोध होत असताना सुद्धा आंबेडकरी  अनुयायी थोडे सुद्धा डगमगले नाही. नांदेडचा  भिमाचा बछडा गौतम वाघमारे सरकार नामांतर लवकर करत नसल्यामुळे भर चौकामध्ये स्वतःला पेटून घेतलं. पेटत असतानासुद्धा त्यांचा एकच नारा होता नामांतर झाले पाहिजे.

मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावा म्हणून एका समतावादी मराठा समाजाच्या मुलाने रेल्वेखाली आपला जीव दिला. त्याच्या खिशामध्ये चिट्ठी होती बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला द्यावं आणि जो विरोध होत आहे तो कमी व्हावा तो मुलगा सातारा जिल्ह्यातील होता त्या समतावादी मराठा मुलाचं नाव विलास ढाणे पाटील   होत. 

  टेंभुर्णी या गावातील पोचीराम कांबळे हा बांधव गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करायचा जय भिम बोलायलाचा त्यामध्येच गावामध्ये नामांतराची  ठिणगी आधीच पडली होती. गाव गुंडांनी पोचीराम कांबळेला मारण्याच ठरवल होत. हाता मध्ये कोयते कुराड लाठ्या काठ्या घेऊन 200 च्या जवळपास पिसाळलेले कुत्रे एखाद्या जखमी वाघावर तुटून पडावे तसे पोचीराम कांबळे वर तुटून पडले. सांग पोच्या जय-भीम बोलशील का? गावात जयंती साजरी करशील का? पोचीराम कांबळे प्रति उत्तर द्यायचा हो मी जय भिम बोलणार गावामध्ये जयंती साजरी करणार . समोर मृत्यू  दिसत असताना सुद्धा  त्यांनी आपल्या विचारधारेशी तडजोड केली नाही . गाव गुंडांनी  त्यांचे दोन्ही हात पाय कापले नंतर जवळच असलेल्या लाकडावर सरण रचलं आणि त्यावर त्यांना पेटवण्यात आले. त्या अग्नी मधून सुद्धा पोचीराम कांबळे जय भीम बोलायचा. मानवतेला काळीमा फासणारी ही क्रूर घटना होती.

या घटना होत असताना सुद्धा आपले आंबेडकरी अनुयायी एक इंच सुद्धा पाठीमागे हटले नाही. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला होता. आपल्या बाबाचं नाव विद्यापीठाला दिलच पाहिजे अशी त्यांनी प्रतिज्ञाच केली होती. यासाठी अनेक आंबेडकरी अनुयायांनी आपल्या  प्राणाची आहुती दिली होती त्यामध्ये जनार्धन मवाडे,प्रतिभा तायडे,सुहासिनी बनसोड, शरद पाटोळे,  पोचिराम कांबळे,अविनाश डोंगरे, गौतम वाघमारे अशा कितीतरी भीमसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आंबेडकरी अनुयाच्या संघर्षामुळे 14 जानेवारी 1994 ला मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाव देण्यात आल.या नावासाठी अनेक भीमसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली  अशा सर्व ज्ञात अज्ञात शहीद झालेल्या सर्व भीमसैनिकांना विनम्र आदरांजली  

जय भीम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com