Top Post Ad

हुकूमशाही लागू करण्याचा ‘पायलट प्रोजेक्ट’ यशस्वी

 


३७ टक्के लोकांचा धार्मिक उन्माद आणि ६३ टक्के लोकांच्या उदासिनतेमुळे भारत देशात नवीन शासन प्रणाली लागू करण्याचा ‘पायलट प्रोजेक्ट’ सुरतमध्ये यशस्वी झाला आहे. म. गांधी व पंडीत नेहरू यांनी भारताला दिलेली ‘लोकशाही’ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले ‘संविधान’ नष्ट करण्यात सुरत प्रकल्पात यश आले आहे. आपण जात, धर्म, महापुरूष, पक्ष, प्रदेश, विचार, भाषा यामुळे एकत्र येऊन एक निर्णय घेऊ शकत नसल्याने देशात हुकूमशाही लागू करण्याचा प्रकल्प यशस्वी ठरला आहे. त्यामध्ये आपण सर्व देशवासीयांचा सहभाग असल्यामुळे त्या यशाचे श्रेय सर्वांना जाते. 

हा पथदर्शी प्रकल्प  गुजरात राज्याची आर्थिक राजधानी सुरतमध्ये राबविला गेला आहे. तो प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. आता हा प्रकल्प भारतभरातील उर्वरित ५४२ लोकसभा क्षेत्रात लागू करण्यासाठी सज्ज झाला आहे. काही लोक त्याला ‘पुतीन पॅटर्न’देखील म्हणतात. ब्लादमीर पुतीन यांनी रशियातील सर्व विरोधकांना निष्प्रभ करून प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकली आहे. सुरत पॅटर्नमध्ये निवडणूक घेण्याची गरजच पडू देण्यात आलेली नाही. भारतात पुतीनपेक्षाही श्रेष्ठ कामगिरी बजावली आहे. आपले शहेनशाह विश्वगुरू आहेत.

सुरतमध्ये विरोधकांचे अर्ज रद्द करणे किंवा त्यांना धमक्या देऊन अर्ज मागे घेण्यास बाध्य करण्यात आले. सुरत लोकसभा मतदारसंघातून पहिल्याच दिवशी काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. त्याकरिता कुंभाणी यांच्या नामांकन अर्जावरील चार अनुमोदकांनी आपण स्वाक्षर्‍याच केल्या नसल्याचे निवडणूक अधिकार्‍याला सांगितले. एवढी निष्पक्ष निवडणूक रशियाचे हुकूमशहा ब्लादमीर पुतीनदेखील घेऊ शकलेले नाहीत. अधिकृत उमेदवाराचा अर्ज रद्द केल्यानंतर काँग्रेसच्या डमी उमेदवाराचाही उमेदवारी अर्ज असाच रद्द करण्यात आला. बीएसपीचे उमेदवार प्यारेलाल भारती २४ तास बेपत्ता होते. ते अखेरच्या दिवशी थेट निवडणूक अधिकारी कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी अर्ज मागे घेतला. याच प्रकारे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उर्वरित आठ अपक्ष उमेदवारांनीही आपापले अर्ज मागे घेतले. त्यानंतर या मतदारसंघातून भाजपचे मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार शिल्लक राहिले. राहुल गांधी आतापर्यंत ही लोकसभा निवडणूक शेवटची असल्याचा आरोप करीत होते. तो सुरत प्रोजेक्टमध्ये सिद्ध करून दाखविण्यात आला आहे. या पद्धतीने सुरतचा हुकूमशाही पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे. निवडणूक आयोगाकडून दलाल यांच्या नावाची लवकरच घोषणा केली जाणार आहे. या घोषणेनंतर हा प्रायलट प्रोजेक्ट देशभर राबविण्यास कोणाचीही हरकत राहणार नाही. मला माझी जात दुसर्‍या जातीपेक्षा श्रेष्ठ आहे आणि माझा धर्म महान आहे. माझ्या जात आणि धर्मापुढे लोकशाही, स्वातंत्र्य, बुंधत्व तथा संविधानाचे काहीही महत्त्व नाही, हे माझे दुर्दैव म्हणा तर.

@ मिलिंद कीर्ती, नागपूर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com