सर्वात अधिक गुंतागुंतीच्या मतदार संघापैकी एक अर्थात उत्तर मध्य मुंबईतील गुंतागुंतीचा तिढा अखेर सुटला. आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षामधील सर्वच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आज काँग्रेस पक्षाने वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहिर केली आहे. मुंबईमधील जागा वाटपाबाबत पक्षाने विचारात घेतले नसल्याचे सांगत मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. उमेदवारी मिळत नसल्याने त्या नाराज होत्या. लोकसभा निवडणूक लढवण्यास त्या इच्छुक होत्या, या पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. .
वर्षा गायकवाड यांना उमेदवारी घोषित केली जात नसल्यावरून शिवसेना नेते मिलिंद देवरा यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. दलित असल्यामुळे मुंबईतून त्यांना उमेदवारी देऊ नये, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिला आहे, असा गौप्यस्फोट मिलिंद देवरा यांनी केला होता. काँग्रेसमधूनही वर्षा गायकवाड यांची मुंबई अध्यक्षपदी नेमणूक करताना विरोध झाला होता. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या २१ उमेदवारांमधून फक्त एका दलित उमेदवाराला निवडणुकीत संधी दिली आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. दरम्यान उत्तर मध्य मुंबईतील महाविकास आघाडीचा उमेदवारी जाहीर झालीय. पण महायुतीकडून अद्याप कोणताच उमेदवार देण्यात आलेला नाहीये, यामुळे वर्षा गायकवाड यांची लढत कोणासोबत असेल हे पाहावं लागेल.
काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या असल्याने वडिलांच्या राजकारणाचा वारसा असलेल्या वर्षा एकनाथ गायकवाड ह्या एक भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत. २०१९ साली त्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री होत्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर धारावी विधानसभा मतदारसंघातून सन २००४पासून सतत चार वेळा निवडून आल्या आहेत. प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केले आहे. त्या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री म्हणून राज्यातील पहिल्याच महिला शालेय शिक्षण मंत्री होत्या. २०१९ मध्ये गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. २०१० ते २०१४ या काळात त्या महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री होत्या.
उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून राज्याच्या माजी मंत्री आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार Varsha Gaikwad ताई यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! त्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ताई खूप खूप शुभेच्छा! - सुरेशचंद्र राजहंस... प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष स्लम सेल विभाग
0 टिप्पण्या