नेर.. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समस्त स्त्रियांच्या विकासासाठी अतोनात कष्ट घेतले हाल अपेष्टा सहन केल्या त्यामुळे स्त्रियांची आजची प्रगती दिसत आहे म्हणून आजच्या स्त्रियांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या हाल अपेष्टा आणि कष्टांना विसरू नये असे आवाहन नेर नबापूर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष शिवानीताई गूगुलिया यांनी केले त्या दिनांक 13 जानेवारी रोजी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या अंतर्गत फूड प्रोसेसिंग या प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई कोठारी डॉ. शरद मोरे व श्रीमती पुष्पा सोईतकर उपस्थित होते
स्थानिक गांधी चौकातील श्रद्धाताई सोईतकर यांच्या हॉलमध्ये सदर कार्यक्रम घेण्यात आला होता याप्रसंगी पुढे बोलताना गुगलिया म्हणाल्या की बचत गटाकडून मिळणाऱ्या कर्जाचा योग्य विनियोग करून उद्योग उभारणी करा आणि ज्या ज्या वेळेला मदत लागेल त्या त्या वेळेला मी आपल्याला पूर्ण मदत करीन असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले गेल्या वर्षी बावीस एक 2025 ते 1/ 3 /2025 या कालखंडात परदेशी कर यांच्या हॉलमध्ये फूड प्रोसेसिंग प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला होता हा कार्यक्रम भारत सरकारच्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालया
अंतर्गत असणाऱ्या विकास आयुक्तालयाच्या माध्यमातून जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत जिल्हा उद्योजकता विकास केंद्रा द्वारे आयोजित होत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल पोदुतवार प्रास्ताविक श्रद्धा सोईतकर आणि आभार प्रदर्शन निशिगंधा बेंद्रे यांनी केले यावेळी शिल्पा चीरडे यांनी प्रशिक्षणाच्या संबंधी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात स्त्रियांची उपस्थिती होती

0 टिप्पण्या