मुंबईतील चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक १५३ मधील घाटले गाव परिसरातील खारदेवनगर भागात भरदुपारी घरोघरी पैसे वाटप करताना एका तरुणाला पोलिसांनीच रंगेहात ताब्यात पकडले. हे पैसे वाटप शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून केले जात असल्याचा दावा शिवसेना उबाठाचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांनी केला आहे.विशेष म्हणजे हे पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
काल दुपारी दोन्ही पक्षाच्या उमेदवारांच्या शेवटच्या दिवसातील प्रचार पदयात्रा सुरू होत्या.त्यावेळी खारदेवनगर भागात सात-आठ तरुण घरोघरी पैसे वाटप करत होते,अशी तक्रार स्थानिकांनी करताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे समजताच सर्वानी तिथून पळ काढला.परंतु प्रत्यक्ष पैसे वाटणारा एकजण पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसानी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.या घटनेनंतर उबाठाचे माजी नगरसेवक पाटणकर यांनी हे पैसे वाटप शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या कार्यकर्ते करत होते दावा केला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

0 टिप्पण्या