नगरपरिषद निवडणूकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच चढाओढ पाहण्यास मिळाली. पण, या लाटेतही वंचित बहुजन आघाडीने अमरावती, नांदेड, अकोला, कणकवली आणि अहिल्यानगरमध्ये आपली दखल घेण्यास भाग पाडलं. अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडीने नगराध्यपद पटकावलं आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगरपरिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका निलेश विश्वकर्मा यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. तर अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार अख्तर खातुन यांचा विजय झाला आहे.
दरम्यान, नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये फुले,शाहू,आंबेडकरवादी तसेच आरएसएसच्या राजकारणाच्या विरोधात असलेल्या मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान करून भक्कम पाठिंबा दिला असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

0 टिप्पण्या