मुंबईसह महाराष्ट्रात परप्रांतीयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला कोणतेही निबंध आज महाराष्ट्रात नाहीत. उलट मराठी माणसालाच मुंबईमधे उपाऱ्यासारखे राहावे लागते आहे. या आणि अशा अनेक गोष्टी दररोज मोठ्या शहरी भागात घडत असताना आपण समाजमाध्यम आणि वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतो. काही राजकीय पक्ष मराठी च्या आकसापोटी तर काही दिखाव्याच्या मराठी च्या प्रेमापोटी सोयीची भूमिका घेऊन प्रत्यक्षात राजकारण करत असतात. खर तर मराठी साठी अनेक वर्षांपासून अनेक वेगवेगळ्या संघटना संस्था प्रामाणिकपणे लढत आहेत. तरी देखील त्यांना ज्यावेळी वेळ येते तेव्हा त्याच श्रेय लाटण्यासाठी वेगळे च लोक उभे असतात. आणि प्रामाणिकपणे काम करणारे मागे राहत असतात. या सगळ्यामुळे मराठी साठी खर प्रत्यक्षात काम करणाऱ्यांची संख्या कमी व्हायला लागलीय.
अशातच हुतात्मा दिनी अनेक संघटना संयुक्त महाराष्ट्रातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येत असतात त्यावेळी एकत्र आलेल्या संघटनांची चर्चा होऊन सर्वानुमते निर्णय घेऊन मुंबई आणि आसपास च्या परिसरातील महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये मराठी उमेदवार उतरले पाहिजे ही ठाम भूमिका घेण्यात आली. त्याच अनुषंगाने बैठका घेऊन मुंबई आणि परिसरातील मराठी साठी आणि मराठी माणसांसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संघटना आज इथे एकत्र येत महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर तिसऱ्या आघाडी ची घोषणा आज आम्ही करीत आहोत. या आघाडीचे नाव "संयुक्त महाराष्ट्र आघाडी असेल. यातील सर्व घटक संघटना, पक्ष येणाऱ्या महानगरपालिका या याच नावाने निवडणुकीत निवडणूक लढवतील.संयुक्त मराठी मुंबई चळवळ / स्वायत्त महाराष्ट्र अभियान / सेवार्पण प्रतिष्ठान / संभाजी ब्रिगेड / शिवराज्य ब्रिगेड / छाया ब्रिगेड / अखिल भारतीय मराठा महासंघ / मराठी एकीकरण समिती, /महाराष्ट्र /संरक्षण संघटना, / मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती, / लोक संघर्ष पक्ष,/ अखिल भांडुप वारकरी भजन मंडळ, / श्री संत एकनाथ महाराज सेवा मंडळ, / संत ज्ञानेश्वर तुकाराम सत्संग भजन मंडळ कोकण नगर हनुमान मंदिर / श्री शिवसंग्राम फाउंडेशन / शिवयुनिटी फाउंडेशन / जय भीम आर्मी / जनसेना / क्षत्रिय मराठा समाज सेवा संप / स्थानिक मच्छीमार निःस्वार्थ सेवा फाउंडेशन पालघर / वर्ल्ड मराठा सेवक परिवार / क्षत्रिय मराठा परिवार / बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटना या संघटना सह येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्व जागा तिसऱ्या आघाडी च्या माध्यमातून आम्ही लढणार आहोत. तिसऱ्या आघाडी मधे सामील होण्यास इच्छुक संघटना पक्ष यांचे आम्ही जाहीर स्वागत करीत आहोत. फक्त त्यांची भूमिका ही मराठी साठी आग्रही असणे गरजेचे असणार आहे ही महत्वाची अट आघाडी ची असणार आहे.

0 टिप्पण्या