आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी " आदर्श आचारसंहिता " मोठा गाजावाजा महापालिकेचे निवडणूक अधिकारी तथा प्रशासक तथा आयुक्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीची बैठक घेऊन करीत आहेत. विशेषत निवडणूका निर्भय ,मुक्त ,पारदर्शक, लोकशाही मुल्यांचे संवर्धन, निष्पक्ष व विश्वासार्ह व्हावी तसेच निवडणूक कायद्याचा तंतोतंत आदर करून वगैरे संवेदनशील, आकर्षक शब्दांचा प्रयोग करून आवाहन करीत आहे. परंतू महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम नुसार सदर आदर्श आचारसंहिता ही दोषपूर्ण असल्याची खात्री पटते.
प्रथमतः उपरोक्त अधिनियम कलम १० नुसार कोणाची ही थकबाकी असेल आणि अनधिकृत बांधकाम केले असेल तर तर तो अर्जदार निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरेल पण हे कलम राजकीय पक्षांना लागू नाही. ठाणे महापालिका क्षेत्रात राजकीय पक्षांची सुमारे ९५% कचेऱ्या बेकायदेशीर/ अनधिकृत आणि कर भरत नसल्याचे काही वर्षांपूर्वीच स्पष्ट झाले होते. ही माहिती असताना निवडणूक अधिकारी तथा प्रशासक तथा आयुक्त सदर प्रतिनिधींना बैठकीला आमंत्रित कसे काय करू शकतात ? यावर कढी म्हणजे ठाणे महापालिका जेव्हा जेव्हा वर्तमानपत्रात निवडणूका संबंधित जाहीरात देते तेथे आयुक्त सहीसह " अनधिकृत बांधकामाला आळा घाला .अनधिकृत बांधकाम दिसल्यास प्रभाग समितीत तक्रार करा ! " असे स्पष्ट पणे लिहीले असते.निवडणूक आयोगाला एक प्रामाणिक करदाता / नागरिक/ मतदार म्हणून जाहीर विनंती आहे आपल्याकडून आदर्श आचारसंहितेचा अवहेलना होत नाही का ? यासंबंधात आपण तत्काल महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम याचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी कारण ठामपाने थकबाकी वसूली साठी थकबाकीदारांचा समोर बॅडबाजा वाजवून त्यांना थकबाकी भरण्यास भाग पाडले होते. पण एखादा , दुसरे सोडले तर कोणत्याही पक्षकार्यालयावर जरी ते बेकायदेशीर/ अनधिकृत/ थकबाकीदार असेल त्या कार्यालयासमोर तोडल्याचे वा बॅडबाजा वाचविण्याचा वृतांत वाचण्यात आला नाही. अनेक महापालिका थकबाकीदारांचे पिण्याची पाईप लाईन ही कट करतात मग पक्षकार्यालयावर मेहरबान होण्यास कोणते कलम महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार आहे याची माहिती मतदारांना देणे आदर्श आचारसंहितासाठी हिताचे ठरेल.
माझी निवडणूक आयोगास जाहीर विनंती की राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिलेल्या उमेदवार जर पक्षकार्यालयाची थकबाकी असेल / बेकायदेशीर/ अनधिकृत असेल त्याना अपक्ष जाहीर करावेत पण उमेदवारी थकबाकीदार व अनधिकृत बांधकाम करणारा नसला पाहिजे तर आणि तरच आदर्श आचारसंहिता अधिनियमानुसार असेल कारण जो राजकीय पक्ष्याचा उमेदवार विजयी होईल तो त्या राजकीय पक्ष यांच्याच धोरणाची अंमलबजावणी करणार आहे अन्यथा आचारसंहिता सदोषच
- नितीन देशपांडे.
- सन्माननीय मतदार.

0 टिप्पण्या