Top Post Ad

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार

 मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज (दिनांक ५ डिसेंबर २०२५) सकाळी पदभार स्वीकारला. मावळते अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्याकडून ढाकणे यांनी हा पदभार स्वीकारला. महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी यांनी डॉ. ढाकणे यांचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. ढाकणे यांनी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेतली. 


डॉ. ढाकणे यांच्या प्रशासकीय सेवेची सुरुवात सन १९९४ मध्ये नाशिक येथे उप जिल्हाधिकारी म्हणून झाली. श्री. ढाकणे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २०१० च्या तुकडीचे अधिकारी आहेत. आजवरच्या ३१ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केंद्र शासनाच्या वित्त व उद्योग मंत्रालयात अतिरिक्त खासगी सचिव, सोलापूर महानगरपालिका आयुक्त, जळगाव जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक या पदांची जबाबदार पार पाडली आहे. 

तसेच अहिल्यानगर (अहमदनगर) आणि मालेगाव येथे उप विभागीय अधिकारी, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात खासगी सचिव, ऊर्जा मंत्रालयात खासगी सचिव, ‘महानिर्मिती’चे कार्यकारी संचालक, वित्त मंत्री यांचे खासगी सचिव, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळात सह व्यवस्थापकीय संचालक, मुंबईत अपर जिल्हाधिकारी व नियंत्रक (अतिक्रमण निर्मूलन / निष्कासन), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात उप मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांची देखील जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. अलीकडे ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com