राज्य सरकार आणि पोलीस विभागाच्या नाकर्तेपणामुळे सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांची ओपन हार्ट सर्जरी झालेली असताना त्यांना आपल्या न्यायासाठी धरणे आंदोलन करावे लागत असल्याचा आरोप खुद्द साळवे यांनी आज प्रसिद्धी माध्यमांसमोर केला. मुंबई मराठी पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती दिली. यावेळी बिशप शांतकुमार शेळके, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
परंतु मी 24 दिवस हॉस्पिटल मध्ये मृत्यूशी झुंज देत असताना येवढ्या दिवसात एकही पोलिसांनी येवून माझी विचारपुस केली नाही. पोलिसांनी माझ्या केस मध्ये निष्काळजीपणा करण्याचे एकच कारण होते की यामधून दोर्षीना वाचवणे. यासाठी सेंट्रल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आवताडे त्यांना सहकार्य करणारे काही पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी दोषी असलेल्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण केली असल्याचा आरोपही साळवे यांनी केला. त्याचमुळे येवढ्या गंभीर घटना घडलेला असताना पोलिसांनी माझा जबाब न नोंदविता माझ्या केसला दफ्तरी फाईल करून टाकले. मला न्याय मिळावे म्हणून मी हॉस्पिटल मधून घरी आल्यावर दिनांक 21 जुलै 2025 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाणे पोलीस आयुक्त व आमच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, व आता अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांना निवेदन देऊन दोर्षीवर गुन्हा नोंदवण्यासाठी विनंती केली होती,
परंतु माझ्या त्या निवेदनावर अद्याप कुठलीच कारवाई झाली नसल्यामुळे मी परत दिनांक 4 नोव्हेंबर/2025 रोजी दुसरे निवेदन दिले व त्यात मागणी केली की एक महिन्याच्या आत माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा व कारवाई न करून दोर्षीना पाठीशी घालून वाचविणारे पोलीस निरीक्षक आवताडे व त्यांना सहकार्य करणारे पोलिसांना बडतर्फ करण्यात यावे अन्यथा नाईलाजाने मला मुंबई आझाद मैदान येथे धरणा आंदोलन करावे लागेल, मोठ्या खेदाची गोष्ट आहे की गेल्या 40 वर्षांपेक्षा ही जास्त काळ सामाजिक चळवळीत असताना मी समाज हितासाठी व नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक वेळा आंदोलन केले आहेत. परंतु आज मला स्वतःच्या न्याय हक्कांसाठी आजारी अवस्थेत आंदोलन करावे लागत आहे. दिनांक 8 डिसेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवसापासून आझाद मैदान येथे आमचे धरणा आंदोलन सुरू करणार असल्याचे साळवे यांनी यावेळी स्पष्ट केले.

0 टिप्पण्या