Top Post Ad

मुंबईत बांगलादेशी बोगस किन्नर रॅकेटमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका

 मुंबईत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी बोगस किन्नरांचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. हे बोगस किन्नर सर्वसामान्य जनतेला दिवसाढवळ्या लुटत असून त्यांच्यामुळे येथील जनसामान्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्याविरोधात सबळ पुरावे असून देखील सरकारी यंत्रणा कोणत्याही कारवाई करीत नसल्याचा आरोप  सामाजिक कार्यकर्ते कृष्णा आडेलकर यांनी केला. या बोगस किन्नरांचा म्होरक्या बाबु खान उर्फ  'गुरु मां'  हा बंगाली असून मागील अनेक वर्षे तो भारतात विशेषतः मुंबईत आपले रॅकेट चालवत आहे. आज तो मुंबईतील सुमारे 20 हून अधिक फ्लॅटचा मालक असल्याचा असा दावा आडेलकर यांनी केला आहे. याही पलिकडे बाबुखानची संपत्ती असू शकते मात्र त्याचा तपास करण्याची गरज असल्याचे अडेलकर यांनी आज मुंबई प्रेस क्लबमध्ये प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.  

 बाबुखान याला नुकतेच पोलिसांनी अटक केली मात्र आजारपणाचे कारण देत त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे ही बाब अधिक गंभीर आहे. हा बाबु खान मुंबईत बोगस किन्नरांचे रॅकेट चालवत असून अवैध बांगलादेशी ट्रान्सजेंडर व्यक्तींना आश्रय देऊन आपला धंदा जोरात चालवत आहे. बोगस आधार, पॅन कार्ड तयार करून रॅकेटमधल्या सहकाऱ्यांना सहजपणे भारतीय नागरिकांसारखा दर्जा देतो. या रॅकेटच्या माध्यमातून बाबू खान मोठ्या प्रमाणात वसुली करून घेत असून यावर कोणताही निर्बंध नाही. त्याच्या रॅकेटमधील बोगस किन्नर सर्वसामान्यांकडून जबरदस्तीने वसूली करत असल्याचा आरोपही अडेलकर यांनी केला. 

याआधीही घाटकोपर शहरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी किन्नरांची - घुसखोरी झाल्याने रेड लाईट - एरियात देहविक्री करणाऱ्यांविरोधा  देहविक्री करणाऱ्या महिलांनी हातात फलक घेऊन - अशा किन्नरांना व बाबू खानला देशातून हद्दपार करा, अशी मागणी  केली होती.. त्यावेळेस मुंबई पोलिसांनी बांगलादेशी - घुसखोरांना पकडण्याची जोरदार मोहीम सुरू करून शेकडो बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवले. मात्र मुंबई पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अनेक बांगलादेशी भूमिगत होऊन इतर ठिकाणी फरार झाले. काही काळाने ही मोहीम थांबल्यानंतर ते पुन्हा कार्यरत झाले असून याकडे मुंबई पोलीस व राज्य शासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे. 

गेल्या काही महिन्यांत मुंबई पोलिसांनी अवैध बांगलादेशी नागरिकांवर मोहीम राबवून अनेकांना ताब्यात घेतले आहे. मात्र किन्नर गटांमधून चालणाऱ्या गुप्त तस्करी, बनावट कागदपत्रांचा पुरवठा आणि वसुलीचे व्यवहार याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे आडेलकरांनी स्पष्ट केले. बाबू खानवर विविध पोलीस ठाण्यांत पाचहून अधिक गुन्हे नोंद असल्याचा आडेलकरांचा दावा आहे. "या गटाने सोन्याची मालमत्ता, रोकड आणि शहरातील काही ठिकाणी आर्थिक बळ उभे केले आहे. मुंबईच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्या या अवैध जाळ्याचा पर्दाफाश करणे आता अत्यावश्यक आहे, 

मायानगरी आम्हा सर्वांची आहे. येथे अवैधता वाढणं म्हणजे नागरिकांच्या सुरक्षेला थेट धोका,"  याकरिता 'गुरु मां'वर तात्काळ कारवाई, मालमत्तेची तपासणी व पोलिसांनी विशेष पथक नेमण्याची मागणी अडेलकर यांनी केली. मुंबईत अवैध घुसखोरीचा प्रश्न ऐरणीवर आला असून या प्रकरणात कठोर निर्णयाची मागणी आता प्रत्येक स्तरावरून होत आहे. भारत आमचा देश असून मायानगरी मुंबई आमची आई आहे. या घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईने कधीही आम्हाला उपाशी ठेवले नाही. बांगलादेशी किन्नरांचे हे रॅकेटने देशाशी गद्दारी करीत असून, बांगलादेशी किन्नर मुंबईत घुसवून इथल्या लोकांकडून पैशाची वसुली केली जात आहे. या बाबू खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी अडेलकर यांनी यावेळी केली 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com