बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पवित्र औचित्यावर, मागील २५ वर्षींच्या परंपरेनुसार यंदाही दि. ७ डिसेंबर रोजी जयभीम नगर बुद्ध विहार, हिरानंदानी पवई, मुंबई या ठिकाणी महामानवास मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक किर्तीचे भदन्त विशुद्धानंदबोधि महास्थविर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. धम्मदेसना, परित्राण पाठ, मंगलमैत्री, तसेच भव्य धम्मरॅली, बुद्ध-भीम गीतांचा प्रेरणादायी कार्यक्रम आणि 'जयभीम पँथर या विशेष चित्रपटाचे प्रदर्शन यावेळी होणार आहे. सकाळी ८.ते रात्री १० अशा पूर्णदिवसीय कार्यक्रमाला देश-विदेशातून ६०० पेक्षा अधिक बौद्ध धम्मगुरू व हजारो उपासक उपासिका उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी अधिकाधिक संख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन भिक्खूसंघाने केले. पूज्य भदंत संघप्रिय थेरो, पूज्य भदंत शिलबोधी थेरो, पूज्य भदंत आर. आनंद थेरो, पूज्य भदंत शांतिरत्न महाथेरो, पूज्य भदंत के. आर. लामा, पूज्य भदंत पद्मपाणी थेरो, पूज्य भदंत बोधिशील थेरो, पूज्य भदंत करुणासागर बेरो, पूज्य भदंत बोधिधम्म थेरो, पूज्य भदंत निवीण थेरो, पूज्य भदंत उपाली थेरो आदी भिक्खूंचा प्रमुख सहभाग या कार्यक्रमात असणार आहे.
राष्ट्रीय एकता आणि सर्वभौमिक मानवतेचा संदेश. बाबासाहेबांच्या विचारधारेचा मुख्य स्वर.., समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुत्व याच मूल्यांवर भारतीय संविधान उभे आहे. म्हणूनच या कार्यक्रमाद्वारे भारतीय समाजात राष्ट्रीय एकात्मतेची दृढ भावना निर्माण केली जाते. जात-धर्म-भाषा भेद ओलांडून माणुसकीचा सार्वभौम संदेश पोचवला जातो. तरुण पिढीला नीतिमूल्य, विवेक आणि धम्मप्रेरणा दिली जाते संविधान जगणे आणि जपणे ही कर्तव्यभावना बळकट केली जाते. हा धम्मसोहळा केवळ स्मरणाचा नव्हे तर परिवर्तनाचा, बाबासाहेबांचा संदेश घरोघरी पोहोचविण्याचा आहे. धम्म म्हणजे.., मानवतेची किंमतें समतेची संस्कृती बंधुत्वाची ऊजी याच मूल्यांचा प्रसार हीच या कार्यकमाची प्रेरणा आहे. आपण बाबासाहेबांना बोधिसत्व मानतो आणि बोधिसत्वाचा प्रवास बुद्धत्वाकडे असतो. बुद्धत्व प्राप्तीसाठी दहा पारमिता + दहा उपपारमिता तसेच दहा परमार्थ पारमितांची आवश्यकता असते. बाबासाहेब आमचे पिता- त्यांच्या मंगल पारमितेची वृद्धी करण्यासाठी आपण सर्वानी या मंगल कार्यात सहभागी होणे, हीच खरी मानवंदना आपल्या सहकार्यामुळे.., बौद्धिक मूल्ये आणि संविधान मानवमुक्तीच्या भविष्याकडे एकाच दिशेने वाटचाल करतील! अशी अपेक्षा भदन्त विशुद्धानंदबोधि यांनी केली.

0 टिप्पण्या