सुमेरू प्रकाशन तर्फे डोंबिवलीत दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी सर्वेश हॉल ताई पिंगळे चौक डोंबिवली स्टेशन जवळ, डोंबिवली पूर्व या ठिकाणी प्रख्यात आंबेडकरी साहित्यिक प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांच्या चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. या पुस्तकांच वेगळेपण असं आहे की 36 भाषेमध्ये त्यांची पाऊस नावाची कविता ही प्रकाशित झाली आहे. तर 32 भाषेत माझ्या कविता हा कवितासंग्रह रसिकांच्या भेटीस येत आहे. त्याचप्रमाणे पक्षांच्या कविता तू आणि मी हा एक आगळावेगळा कवितासंग्रह देखील प्रकाशित होत आहे. तसेच बुद्धगया एक यात्रा- अनुभव या प्रवास वर्णनाचा हिंदी अनुवाद पुस्तक रूपाने प्रकाशित होत आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक समीक्षक विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस (माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पिंपरी चिंचवड,) हे आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉक्टर दि बा बागुल (विचारवंत राष्ट्रीय प्रवचनकार कवी) मा.किरण सोनवणे (जेष्ठ पत्रकार कवी विचारवंत). प्रा. भरत शिरसाट (सचिव बौद्ध साहित्य प्रचार संस्था, साहित्यिक, कवी, विचारवंत). प्रा. मंगला पाटील (हिंदी भाषा अभ्यासक, विचारवंत, समीक्षिका) मा. कवियत्री विद्या भोरजारे (साहित्यिका, कवियत्री, विचारवंत) मा जानव्ही मौर्य (पत्रकार तरुण भारत) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुरेश शिंदे करणार असून या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं नम्र निवेदन प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांनी समस्त रसिकांना केलेल आहे.
- सतशील मेश्राम
- (प्रजासत्ताक जनता)

0 टिप्पण्या