Top Post Ad

राज्यातील 22 नगरपरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला नगरपलिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच बड्या नेत्यांच्या आज सभा पार पडणार आहेत. मुख्यमंत्र्यांची संभाजीनगर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, बीडमध्ये सभा होणार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाशिकच्या त्रंबकेश्वर, संभाजीनगरमध्ये तर अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यसह नाशिकच्या भगूरमध्ये सभा होणार आहे.  असे असतानाच न्यायालयीन प्रक्रियेचे कारण देत निवडणुक आयोगाने राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका  पुढे ढकलल्या आहेत.  गेल्या दोन आठवड्यापासून जिथं प्रचाराचा धुरळा उडत होता. तिथं अचानक निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलंय. जिथं जिथं निवडणूक पुढे ढकलली तिथल्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झालाय. जिथं जिथं निवडणूक पुढे ढकलली तिथं आता 20 डिसेंबरला मतदान होईल आणि 21 तारखेलाच मतमोजणी होणार आहे. उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला नियोजित वेळत पार पडणार आहे. 

दरम्यान, निवडणुकीच्या या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतले आहेत. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. कुठला कायदा निवडणूक आयोग काढतोय. ते मला माहित नाही, माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाही,  या ठिकाणी निवडणूक पुढे ढकलणं अत्यंत चुकीचं आहे.  उद्या निवडणुका आणि आज निवडणुका पुढे ढकलतात हे खूप चुकीचं आहे. अनेक उमेदावारांची प्रचाराची मेहनत वाया गेली. निवडणूक आयोग स्वायत्त असलं तरीही अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचंच आहे. याबद्दल रिप्रेझंटेशन आम्ही निवडणुक आयोगाला देऊ, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

22 नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांना स्थगिती- 
अमरावती विभाग-- बाळापूर / अंजनगाव सुर्जी  / यवतमाळ / देऊळगाव राजा / वाशिम
कोकण विभाग- अंबरनाथ
छ.संभाजीनगर विभाग- फुलंब्री  / धर्माबाद  / मुखेड / रेणापूर / वसमत
नागपूर विभाग- घुग्घूस / देवळी
नाशिक विभाग-देवळाली-प्रवरा / कोपरगाव / पाथर्डी / नेवासा
पुणे विभाग- बारामती
फुरसुंगी-उरळी देवाची  / महाबळेश्वर / फलटण / मंगळवेढा / अनगर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com