साप्ताहिक पत्रकारितेतील बदलती आव्हाने, डिजिटल युगातील साप्ताहिकांची भूमिका, संपादकांचे हक्क, समस्या व उपाय, राज्यस्तरीय मुक्त चर्चा व ठराव, ज्येष्ठ संपादक व मान्यवरांचे मार्गदर्शन आदी विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन करण्याच्या हेतूने शुक्रवार, 30 जानेवारी 2026 सकाळी 10.00 ते सायं. 3.00 स्थळ मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे पश्चिम येथे साप्ताहिक संपादक असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय साप्ताहिक संपादक अधिवेशन – 2026 आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ संपादक, अनुभवी पत्रकार, माध्यम क्षेत्रातील व कायदे क्षेत्रातील तज्ज्ञ, साप्ताहिक संपादक असोसिएशनचे पदाधिकारी आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी महाराष्ट्रातील सर्व साप्ताहिक संपादक पत्रकारांनी या अधिवेशनास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9323276613 / 9221117684 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा
0 टिप्पण्या