दिल्ली स्फोट हे सरकारचे पूर्णपणे अपयश आहे. सरकार मस्तीत आले होते. दिल्ली स्फोटात अंतर्गत की बाह्य शक्तीचा हात आहे? असा प्रश्न निर्माण होतो. ते म्हणतील की, अंतर्गत स्फोट झाले नाही, पण अंतर्गत स्फोट झाले आहेत. अंतर्गत स्फोटामध्ये जे काही साहित्य सापडले, ते आरएसएसच्या कार्यकर्त्यांकडे सापडले आहे, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे केला.
लाल किल्ल्याजवळ झालेल्या एका कारमध्ये झालेल्या स्फोटानंतर स्फोटामुळे दिल्ली हादरली आहे. मेट्रो स्टेशनच्या गेटजवळ झालेल्या या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 14 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सायंकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी हा स्फोट झाला. स्फोटानंतर परिसरात खळबळ उडाली. या स्फोटात अनेक वाहनं चक्काचूर झाल्याचं समोर आलं आहे. स्फोटानंतर मोठी आग लागली. या आगीनंतर घटनास्थळावरुन समोर आलेल्या व्हिडिओत अनेक वाहनांचं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. या स्फोटानंतर घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेतली होती. अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. लाल किल्ल्याजवळील चांदनी चौक येथील परिसर लोकांच्या गर्दीचा होता. लग्नसराईनिमित्त लोक खरेदीसाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं पोहोचले होते. मात्र, दिल्ली मेट्रोच्या स्टेशनच्या गेट बाहेर असलेल्या गाडीत स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळ उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा स्फोट एक अपघात आहे की दहशतवादी हल्ला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र सुरक्षा यंत्रणा सर्व अँगलने याचा तपास करत आहेत.दिल्लीत घडलेली स्फोटाची घटना ही अत्यंत वेदनादायी आहे. दिल्लीमध्ये जे घडलं आणि ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. जे लोक या घटनेत जखमी झाले त्यांना लवकर आराम मिळावा अशीही प्रार्थना मी करतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी माझी चर्चा झाली असून सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
“दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाची बातमी खूपच दुःखद आणि चिंताजनक आहे. या दुःखद अपघातात अनेक निष्पाप जीव गमावल्याने दुःख झालं आहे. या दुःखद काळात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्या कुटुंबांबरोबर मी आहे आणि माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. सर्व जखमी लवकरात लवकर बरे होतील अशी मी आशा करतो”, राहुल गांधीं.
"दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट हृदयद्रावक आहे. या दुःखद घटनेतील दिवंगत आत्म्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आणि प्रार्थना आहेत. मृतांच्या आत्म्यांना शांती मिळो आणि जखमी लवकर बरे व्हावेत", देवेंद्र फडणवीस.

0 टिप्पण्या