दरवर्षी हिवाळ्यात शालेय विद्यार्थ्यांचे शारीरिक जडण-घडणीकरिता विविध क्रीडा, खेळ, शर्यत, सांघिख खेळाचे आयोजन 'वंडर किड्स स्कुल' शालेय प्रशासनाकडून करण्यात येते. प्रियदर्शनी पार्क येथे हा वार्षिक क्रीडा दिन पार पडला.वर्षभर केलेल्या शारीरिक कसरतीचा हिवाळ्यात क्रीडा दिनी वेगवेगळ्या खेळातून सामना, स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळते. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक गुणवत्ता वाढते. तसेच त्यांच्यामध्ये संघभावना आणि नेतृत्वाचे गुण विकसित होतात.
स्पर्धेची सुरुवात सामूहिक राष्ट्रगीत व ध्वजारोहण करून करण्यात आली. चिमुकल्यांची स्पर्धा पाहण्यासाठी आणि त्यांच्यात उत्साह भरण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. रेंबो रेस, गुड नाईट रेस, क्रिकेट रेस, जेली फिश रेस, फ्रुट रेस अशा विविध स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे पार पाडण्यात आले. यावेळी भायखळा, माझंगाव, नागपाडा आणि ग्रॅण्टरोड नर्सरी शाळेची बच्चेपार्टी, शिक्षकवर्ग आणि सहायकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून एसीपी शबाना शेख आणि विशेष अतिथी म्हणून अंतरराष्ट्रीय ऍक्रोब्याटिक जिम्यास्टिक प्रशिक्षक सुनील तातू रणपिसे व ऍथलॅटिक मुख्य प्रशिक्षक दीनानाथ मौर्या तसेच प्रशिक्षक शौकात मोहम्मद खान प्रशिक्षक कार्यक्रमात उपस्तीथ होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पदक आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

0 टिप्पण्या