Top Post Ad

बार्टीकडून आरएसएसच्या पुस्तकाचा प्रचार

 आरएसएसचे प्रचारक, मनुस्मृतीचे समर्थक दिवंगत दत्तोपंत ठेंगडी यांनी लिहिलेले 'सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉ. आंबेडकर' या  पुस्तकाचे वाटप सवलतीच्या दरात करण्याचा निर्णय बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी घेतला आहे. यासाठी बार्टीने सदर पुस्तकाच्या प्रकाशकाला ५ हजार प्रतींची ऑर्डर दिली आहे. त्यापैकी २ हजार प्रती बार्टीच्या गोडावूनमध्ये येवून पडलेल्या आहेत. ३ हजार प्रती येण्याच्या मार्गावर आहेत. डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या विचारांचा विपर्यास करणाऱ्या पुस्तकाचा प्रचार आणि प्रसार बार्टीकडून होत असल्याने आंबेडकरी समाजात संतापाची लाट उसळली आहे. बार्टीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्यावतीने बार्टी मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) यांच्यावतीने बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांना निवेदन देण्यात आले आहे. 

आरएसएसचे प्रचारक दत्तोपंत ठेंगडी यांचे हे पुस्तक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान २ व ३ ऑगस्ट रोजी नांदेड येथे आरएसएसचे २० वे समरसता साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनात या पुस्तकांची सवलतीच्या दरात विक्री करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.  ६० वर्षांहून अधिक काळ  आरएसएसचे प्रचारक राहिलेले दत्तोपंत ठेंगडी लिखित हे पुस्तक बार्टी माध्यमातून ८५% सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही पुस्तके खरेदी करणे आणि सवलतीच्या दरात विक्री करणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे असणाऱ्या संस्थेस अशोभनीय असल्याचे  रिपब्लिकन सेनेने यात म्हटले आहे.      मुळात आंबेडकरी विचारधारेवर निष्ठा असणाऱ्या, समाजाला दिशा निर्देशन करणाऱ्या अनेक नामवंत लेखकांची शेकडो पुस्तके उपलब्ध असताना आरेसेसची विचारधारा असंणार्या लेखकाचे पुस्तक विक्रीसाठी निवडणे ही दुर्बुद्धी बार्टीला कुणी  सुचवली? भाजप-आरएसएस बार्टीच्या माध्यमातून आंबेडकरी विचारांना आव्हान देत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.  

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी छेडछाड करून आरेसेसच्या विचारधारेचा प्रचार प्रसार करण्याचा कुटील डाव या पुस्तकातून निदर्शनास येतो.     हे पुस्तक बार्टी मार्फत कोणत्या निकषावरती घेण्यात आले? त्याचे पॅरामीटर्स काय होते? पुस्तक निवड समितीमधील सदस्यांनी कोणत्या प्रकारे या पुस्तकाची चिकित्सा केली आहे? बार्टीला या पुस्तकासंदर्भात नेमका कोणता अभिप्राय दिलेला आहे? सदरील पुस्तकाचे वाटप हे बार्टीमार्फतच का करण्याचे योजिले आहे? की बार्टीमधील अधिकाऱ्यांचे वैयक्तिक आरेसेसशी असलेले हितसंबंध जोपासण्याचा हा प्रयत्न आहे.अशी चर्चा आंबेडकरी समाजामध्ये सुरू आहे.        बार्टीमार्फत अशा अपप्रचारी पुस्तके खरेदी करण्याचे घाट घातले जात आहेत. ज्यामध्ये अव्वाच्या सव्वा किमती असलेल्या पुस्तकांची जास्तीत जास्त खरेदी केली जात आहे. यामागचे कारण गुलदस्त्यात आहे. सामाजिक न्याय विभागाचा बार्टीवर कोणता अंकुश नाही का? बार्टीमधील अधिकाऱ्यांनी अनुसूचित जातीतील लोकांना भ्रमित करण्याचा बाबासाहेबांनी मांडलेल्या समतेच्या विचारांपासून लांब नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जाणवत आहे.    काही प्रकल्प व्यवस्थापकांना हाताशी धरून टक्केवारीच्या लालसेने या प्रकरची पुस्तके घेतली जात असावी असा दाट संशय व्यक्त करण्यात आला आहे. राज्य शासनाने लवकरात लवकर या सर्व प्रकरणाची चौकशी करावी. राज्य शासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही तर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेने दिला आहे.

     प्रस्तुत 'सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉ.आंबेडकर' या पुस्तकाचे लेखक दिवंगत दत्तात्रेय बापूजी तथा दत्तोपंत ठेंगडी हे सामाजिक समरसता मंचाचे संस्थापक असून ते मनुस्मृतीचे प्रशंसक आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ६० वर्षांहून अधिक काळ प्रचारक राहिलेले आहेत. आरएसएसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विपर्यास करणारे लेखन असणारी पुस्तके वितरित करण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी बार्टीचा वापर केला जात आहे.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा आरएसएस नेहमीच विपर्यास करीत आली आहे. त्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकांची निर्मिती केली आहे.   महामानव डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या विचारांचा विपर्यास करणार्या या पुस्तकाची विक्री बार्टीने तात्काळ थांबवावी, हे पुस्तक खरेदी करू नये या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून निवेदन देण्यात आले. परिणामी बार्टी महासंचालक सुनील वारे यांनी हे पुस्तक खरेदीचे आदेश रद्द करण्याबाबत पत्र वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांना दिले. यावेळी विश्वास गादादे, बी पी सावळे, अनिल परमेश्वर, गोपाल वाघमारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com