ब्राम्हणांनी साधारणतः हजार–बाराशे वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात जातीव्यवस्था निर्माणाला सुरुवात केली. जातीव्यवस्थेच्या उतरंडीत कोणत्या जातींना वरच्या भागात स्थान द्यायचे आणि कोणत्या जाती रसातळाला गाडायच्या याचे विविध निकष ब्राम्हणांनी लावले. त्यात ज्यांच्याकडे संपत्ती व अधिकार होते त्यांना ब्राम्हणांनी जातीव्यवस्थेत वरचे स्थान दिले, तर ज्यांनी ब्राम्हणी व्यवस्थेला प्रखर विरोध केला त्यांना अस्पृश्य जातीत ढकलले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ’भारतातील जाती’, ’अस्पृश्य पूर्वीचे कोण होते?’ आणि ’जातीप्रथेचे विध्वंसन’ या ग्रंथांत याविषयी सविस्तर मांडणी केली आहे. जातीव्यवस्थेत सर्वोच्च स्थानी स्वतःची वर्णी लावण्यात ब्राम्हणांनी ’शाकाहार’ हा एक निकष लावला होता. मुळात त्यांनी शाकाहार बौद्ध भिक्खूंकडून चोरला होता हे येथे उल्लेखनीय. त्यांनी अनेक बाबी बौद्धांकडून चोरल्या, तसंच शाकाहारही चोरला. तसे तर त्यांचा धर्मच बौद्धांकडून चोरलेल्या बाबींवर उभा आहे हे तर सर्वश्रुत आहेच.
आज ब्राम्हण स्वतःला शुद्ध शाकाहारी आणि शुद्ध चारित्र्याचे म्हणून मिरवत असले, तरी गतकाळात त्यांचे खाण्याचे आणि दाखवण्याचे दात कोणते होते ते त्यांच्याच बापजाद्यांनी लिहिलेल्या ग्रंथात आजही उपलब्ध आहे. हे ग्रंथ दाखवून देतात, की ब्राम्हण फक्त मांसाहारीच नव्हते, तर आज ते ज्या गाईला पवित्र मानण्याचे ढोंग करतात, ती गाय आणि तिचे बछडेही त्यांनी खाण्याचे सोडले नव्हते.
प्राच्यविद्यापंडीत कॉ. शरद् पाटील आपल्या एका ग्रंथात म्हणतात, ”गोमांस इ.स. १००० पर्यंत खुद्द ब्राह्मणच खात होते. भवभूतीच्या (इसवीचे ७ वे शतक) 'महावीरचरित' या संस्कृत नाटकात राजा जनक परशुरामाच्या पाहूणचाराकरीता दोन वर्षांची कालवड शिजवीत असतांना दाखवले आहे.”
(शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण - महंमदी की ब्राह्मणी?, पृष्ठ १२१)
भवभूती आपल्या नाटकात म्हणतो,
”जनकः —
भो भोः शीघ्रमातिथ्यं विधीयताम् ।
द्विवत्सा वत्सतरी दीयतां पच्यताम् ।”
अर्थ : हे बरे, लवकर अतिथिसत्काराची व्यवस्था करा. दोन वर्षांची कालवड आणा आणि शिजवा.
(महावीरचरितम, अंक ३रा)
इतकेच नव्हे, तर ब्राह्मण ज्या वेदांना अपौरुषेय व पृथ्वीतलावरील सर्वात पवित्र ग्रंथ मानतात, त्या वेदांमधील आद्यवेद म्हणजे 'ऋग्वेद'.
ऋग्वेदात गोमांसासंदर्भात म्हटले आहे,
”उक्षणों ही में पंचदंश साकं पंचंती: विष्तीम्।
उताहमदिम पीव इदुभा कुक्षी प्रणंती में विश्वस्मान्द्रीन्द्र।।”
अर्थ - इंद्राणीद्वारे प्रेरीत यज्ञकर्ता माझ्यासाठी (इंद्रासाठी) १५ - ३० बैल कापून शिजवतो, ज्यांना खाऊन मी धष्ट-पुष्ट होतो. ते माझ्या नसा-नसात सोमरस (दारू) भरतात.
(ऋग्वेद, १० - ८६ - १४)
ऋग्वेदातील पुढील उल्लेख पहा..
”आंद्रीनाते मंदीन इंद्र तृयान्स्सुन्बन्ती।
सोमान पिवसित्व मेषा।।
पंचंन्ति ते वषमां अत्सी तेषां।
पृशेण यंन्मधवन हुय मान।।”
अर्थ - हे इंद्र! अन्नसेवनाच्या इच्छेने तुझ्यासाठी जेव्हा हवन केले जाते, तेव्हा यजमान शीघ्रताशीघ्र सोमरस तयार करतो. तो तू पितोस. यजमान बैल शिजवतो आणि त्याला तू खातोस.
(ऋग्वेद, १० - २८ - ३)
उपरोक्त ऋग्वेदीय ऋचा आर्य ब्राह्मणांचा अर्थात देवांचा राजा इंद्र याच्या संदर्भाने आलेल्या आहेत. यात स्पष्टपणे इंद्राला बैल व दारू यांचा नैवेद्य चढवण्याचा उल्लेख आला आहे.
व्यास महाभारतात लिहितात,
”राज्ञो महानसे पूर्व रंतीदेवस्य वैद्विज
द्वैसहस्र तु वध्यते पशूनामन्वहं तदा
अहन्यहनि वध्यते द्वैसहस्रे गवां तथा
समांसं ददतो हान्नं रंतीदेवस्य नित्यश:
अतुला कीर्तीरभवन्नुप्स्थ द्विजसत्तम"
अर्थ - राजा रंतीदेवाच्या स्वयंपाकगृहात दोन हजार पशू कापल्या जात होते. प्रतिदिन दोन हजार गायी कापल्या जात होत्या. मांससहित अन्नदानामुळे राजा रंतीदेवाची अतुलनीय कीर्ती झाली.
(महाभारत, वनपर्व, अध्याय २०८, श्लोक ८–१०)
महाभारतातीलच पुढील श्लोक पहा,
”महानदी चर्मराशेरू त्क्लेदात संसृजे यत:
ततश्चर्मन्वतीत्येवं विख्याता सा महानदी”
अर्थ - राजा रंतीदेवाने गायींची चामडी सोलली. त्या चामड्यांतून गळणाऱ्या रक्ताच्या थेंबांतून एक महानदी निर्माण झाली. तिला चर्मन्वती म्हणतात.
(शांतीपर्व - अध्याय २९, श्लोक १२३)
महाभारतातील उपरोक्त श्लोक निर्विवादपणे स्पष्ट करतात, की ब्राम्हणांना गायीचे मांस वर्ज्य नव्हते, तर अतिथी सत्कारासाठीचा मुख्य मेनू म्हणून ते मोठ्या आनंदाने शिजवल्या जाई.
काश्मीरमध्ये शैव व तंत्र परंपरेला मानणारे ब्राम्हण अगदी ब्रिटिशकाळापर्यंत सर्रास गोमांस खात असत. बंगालमध्ये (विशेषतः पूर्वीच्या बंगालमध्ये, आता बांगलादेशातही) बरेच ब्राह्मण गोमांस खातात. श्यामाचरण दास, रजनीकांत सेन यांसारखे प्रसिद्ध बंगाली ब्राह्मण गोमांस खात असत. आजही कोलकात्यात जुनी शाक्त परंपरा असलेल्या काही ब्राह्मण कुटुंबांत गोमांस खाल्लं जातं. आसाम, ओडिशा, महाराष्ट्रातल्या काही तांत्रिक ब्राह्मणांनी (विशेषतः दुर्गापूजा, कालीपूजा यात बलिदानाच्या वेळी) गाईचं बलिदान दिल्याचे आणि गोमांस खाल्ल्याचे ऐतिहासिक दाखले आहेत. विदेशात राहणारे अनेक ब्राम्हण आजही मोठ्या चवीने गोमांस खातात आणि तशा पोस्ट सोशल मीडियावर टाकतात. असो.
ऋग्वेदामध्ये गायींच्या रक्षण करण्यासंदर्भातील, गायींनी चांगलं दुधदुभतं द्यावं, शेतीसाठी चांगले बैल द्यावेत, यासंदर्भातील ऋचाही आलेल्या आहेत. ’अशा ऋचांच्या निर्मात्या स्त्रीया आहेत’, असे कॉ. शरद् पाटील म्हणतात. जगभरात शेतीचा शोध स्त्रियांनी लावला असल्याचे इतिहास संशोधकांनी सिद्ध केले आहे. गाय आणि बैल हे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त प्राणी होते. गाय शेतकऱ्यांना दूध देत होती, शेतीसाठी बैल देत होती, मल-मूत्राच्या रुपात खत देत होती, त्यामुळे गाय हा त्यांना प्रिय असणे स्वाभाविक होते, पण ज्यांच्या हजारो पिढ्या शेतकरी-कष्टकरी यांच्या श्रमाच्या कमाईवर पोसल्या गेल्या, ज्यांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीखाली येतात की जमिनीवर येतात हे सुद्धा माहीत नाही, ज्यांच्या औलादीला 'दूध कौन देता है?' या प्रश्नाचे उत्तर 'दूधवाला देता है!' असंच माहीत आहे, अशा लोकांचा आणि गायींचा काय संबंध आहे, हा माझा सवाल आहे?
पण इतिहासाची विडंबना अशी आहे, की गायींशी ज्यांचे काडीमात्रही सोयरसुतक नाही, अशा औलादी आज त्याच गायींवरून देश पेटवत आहेत. आपले इतिहासाचे अज्ञान या सर्व बाबीला कारण आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे!
इतिहासाच्या अज्ञानाबरोबरच वर्तमानाचेही भान आपल्याला राहिलेले नाही. ज्या गोवंशहत्येसंदर्भात मुस्लिम-दलितांना जबाबदार धरले जाते, तेच याला जबाबदार आहेत काय? यासंदर्भातील वस्तुस्थिती आपण तपासली पाहिजे. आज देशातील प्रमुख दहा गोमांस विक्रय करणाऱ्या कंपन्यांमध्ये Al Kabeer Exports Pvt. Ltd (मालक – सतीश साबरवाल व अतुल साबरवाल), Arabian Export Pvt. Ltd. (मालक – सुनील कपूर), MKR Frozen Food Exports Pvt Ltd (मालक – मदन अबोट), Al Noor Exporters Pvt Ltd (मालक – सुनील सुद व अजय सूद) यांचा समावेश होतो. देशातील जनतेला गाईचे महात्म्य ओरडून सांगणाऱ्या तिला माता म्हणून माथी मारणाऱ्या या तथाकथित गोभक्तांचे, भेकड गोरक्षकांचे आणि स्वयंघोषित हिंदुधर्मसंरक्षकांचे खाण्याचे दात पहा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात, ”जे राष्ट्र, जो समाज आणि जी व्यक्ती इतिहास विसरते; ते राष्ट्र, तो समाज आणि ती व्यक्ती इतिहास निर्माण करू शकत नाही, ते इतिहासजमा होते”, म्हणून आपल्याला पुनरपि आपल्या सत्यइतिहासाचं पुन्हा डोळे उघडे ठेवून वाचन-मनन-चिंतन करावं लागेल आणि त्याचं सिंचन समाजात करण्यासाठी लेखन-भाषण या माध्यमातून प्रबोधन करावं लागेल.
आज आनंदाने गाईचे शेण खाणारी आणि मूत्र पिणारी जमात कशी त्याच गाईची हत्या करून तिला आनंदाने सेवन करत होती हा इतिहास प्रत्येकाने वाचावा.
संदर्भ सूची :
१. शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण - महंमदी की ब्राह्मणी? - कॉ. शरद पाटील
२. महावीरचरितम - भवभूती
२. ऋग्वेद
३. महाभार
0 टिप्पण्या