एकेकाळी मुंबईच्या ओळखीचा भाग ठरलेले दगडी फूटपाथ आता शहरातून जवळपास अदृश्य झाले आहेत. मात्र फाउंटन परिसरात, सिधार्थ कॉलेजजवळ अजूनही हे फूटपाथ दिसतात. पण नव्या सुशोभीकरण आणि नूतनीकरणाच्या नावाखाली या दुर्मिळ दगडी फूटपाथचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे. वारसास्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात दररोज अनेक पर्यटक हेरिटेज वॉक साठी येतात. त्यांच्यासाठी या दगडी फूटपाथचे जतन होणे म्हणजे मुंबईच्या वारशाचा ठसा टिकवण्यासारखे आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या वारसा विभागाने या मुद्द्याकडे लक्ष देऊन तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वारसाप्रेमींकडून केली जात असून जेष्ठ पर्यावरण प्रेमी दिनानाथ पाटकर यांनी याबाबत संबंधित सर्व विभागाला पत्रव्यवहार केला आहे. हे दगड आता कुठेच मिळत नाहीत. निर्माण होऊ शकत नाहीत. हा दुर्मिळ दगड फक्त आपल्या भारतात आहे. त्याचे जतन झाले तर भविष्यात आपल्या पुढच्या पिढीला भारतात काय काय होते याची माहिती मिळेल. असे पाटकर यांनी सांगितले.
0 टिप्पण्या