आजपर्यंत राजकीय टीका टिप्पणी होत असताना आपण पाहतो राज्यातले काँग्रेस -तत्कालीन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते - नेते वंचित आघाडी बद्दल बोलताना नेहमी कुत्सितपणे बोलतात तुमचे आमदार किती ? तुमचे खासदार किती ? पण तुमचे अनेक आमदार -खासदार असताना तुम्ही सत्तेत असताना तुम्हाला जे जमले नाही, महाराष्ट्राच्या राजकारणाचे भीष्मपिता म्हणवणारे शरद पवार साहेब असतील, काँग्रेसचे राहुल गांधी असतील,अनेक मोठ्या पक्षांचे नेते असतील ह्या संबंध देशात कोणी हिंमत दाखवली नाही ते काम आज सुजात आंबेडकर यांनी करून दाखवले. RSS ला खुले आव्हान देण्याची ही घटना ऐतिहासिक आहे.
केंद्रात -राज्यात सत्ता असताना RSS ला शिंगावर घेणे हे कोण्या लेच्या पेच्याचे काम नाही, बाबासाहेबांचे रक्त अश्या कोणत्याच सत्तेच्या दबावाला भीक घालत नाही, हे आज सुजात भाईनी ठासून सांगितले आहे. इतरवेळी बौद्धिक गप्पा हाणणारे संघी नेते कार्यकर्ते आज सुजात भाईना सामोरे जायला तयार नव्हते. माझ्या मते त्यांच्याकडे असणाऱ्या लाठ्या काठ्या किंवा आधुनिक शस्त्रे घेऊन तरी किमान 5-10 लोकांनी तरी समोर येऊन चर्चा करायला हवी होती. त्याच्या म्हणण्यानुसार अर्ध्या तासात सिमेवर लढ्याला जायची तयारी असणाऱ्या संघटने एवढा भीतरेपणा तरी दाखवायला नको होता
आजच्या मोर्च्यात सुजात भाईनी दोन अतिशय महत्वाचे मुद्दे मांडले आहेत, ते म्हणजे RSS चे नोंदणी (रजिस्ट्रेशन) का नाही ? त्यांच्याकडे असणाऱ्या आधुनिक शस्त्रअस्त्राची नोंदणी का नाही ? RSS एका बाजूला म्हणते बाबासाहेब आम्हाला पूजनीय आहेत, आम्ही देशाचे संविधान मानतो मग त्याच संविधाना नुसार जो कायदा आहे त्यात साधं गल्लीत 20-25 तरुण मुलांचे मंडळ जरी असले तरी त्याची कायदेशीर नोंदणी आवश्यक असते. मग RSS ह्या संघटनेची नोंदणी का नाही ?
दुसरा मुद्दा शस्त्र परवाना ― आर्म्स ऍक्ट नुसार विनापरवाना आपल्या देशात कोणालाच शस्त्र बाळगता येत नाही. मग RSS कडे एवढी शस्त्र कुठून आली ? त्याची नोंदणी कोणाकडे आहे ? ज्या काही राजकीय/व्यवसायिक लोकांना जीवाला धोका असल्यास तशी पोलिसांना खात्री असल्यास वैयक्तिक शस्त्र परवाना मिळतो. निवडणूक काळात असे सगळे परवानाधारी शस्त्र संबंधित पोलीस स्टेशनला जमा करावी लागतात, मग अश्यात RSS ला एवढी शस्त्र बाळगायला परवानगी कशी ? ह्याचा अर्थ RSS ही संघटना ह्या देशाचे संविधान मानत नाही. ह्या देशाचा कायदा मानत नाही. आणि ह्या शस्त्रांची नोंदणी होऊ नये म्हणूनच कदाचित संघटना म्हणून नोंदणी एवढ्या वर्षात केली नसेल, हे उघड आहे. ज्या शस्त्रांची नोंदणी नाही त्याने कोणाचेही खून पाडले जाऊ शकतात कारण त्याची नोंदच नाही त्यामुळे त्याची फॉरेन्सिक डिटेल्स येणारच नाहीत.
सुजात आंबेडकर यांनी जी हिंमत दाखवली ती हिंमत महाराष्ट्रातील विविध पक्ष > नेते > संभाजी ब्रिगेड > मराठा सेवा संघ > ह्या सारख्या विविध संघटनानी तसेच सामाजिक संघटनांनी एक भारतीय नागरिक म्हणून RSS ला खडा सवाल केला पाहिजे.ह्या देशात सर्वांना समान कायदा पाळावाच लागेल ह्यात कोणाला सूट मिळणार नाही हा संदेश सर्वसामान्य लोकांन पर्यंत गेला पाहिजे.
शेवटी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. सत्तेच्या दबावाने पोलिसांनी परवानगी नाकारली पण, तेवढ्याच त्वेषाने ठासून सांगितले काही झाले तरी मोर्चा काढणारच जे बोलले ते केले. मोर्च्याचे नियोजन देखील सुरेख केले होते. एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने गोष्टी हाताळाव्या एवढं बारीक प्लॅनिंग स्पष्ट दिसत होते.
कोणतेही असामाजिक तत्व मोर्चामध्ये घुसून जाणीवपूर्वक आंबेडकरी समाजाला बदनाम करणार नाही ह्या बद्दल जी चोख व्यवस्था केली होती त्यासाठी आद. बाळासाहेब आंबेडकर यांचा अनुभव जसाच्या तसा सुजात भाईनी आत्मसाद केला आहे. वंचित आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या/सर्व आंबेडकरी तरुणाईच्या जिद्दीला सलाम करावा असा आजचा मोर्चा होता.
भविष्यकाळात ह्या देशाच्या इतिहासात, RSS संबंधी जे लिखाण होईल त्यात आजचा दिवस आणि सुजात आंबेडकर असे खास महत्त्व अधोरेखित करावी लागेल की बाबासाहेब आंबेडकरांच्या पणतूने आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या सुपुत्राने निर्भीडपणे RSS ला आव्हान दिले, उघड प्रश्न केले ह्या कृतीची नोंद इतिहासात घेतली जाईल.
निरंकुश सत्ता असताना सत्तेच्या छाताडावर उभे राहून प्रश्न विचारण्याची धमक आंबेडकरी विचारांचे सच्चे पाईक असणाऱ्या सुजात आंबेडकर यांनी दाखवली त्यासाठी त्यांचे कौतुक करावे लागेल.समस्त आंबेडकरी तरुणाई त्यांच्या मागे ठामपणे उभी राहिली ही घटना खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे.
_सुशांत_कांबळे

0 टिप्पण्या