जागतिक मानसिक आरोग्य दिन निमित्ताने दि सोशल सर्व्हिस लीग संचालित एन. एम. जोशी डिप्लोमा इन सोशल वर्क अँड कम्युनिटी मेंटल हेल्थ प्रशिक्षण वर्गात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पोस्टर स्पर्धा आणि पथनाट्ये याद्वारे अनेक नव्या संकल्पना पुढे आल्या असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध लेखिका डॉ. सुमन नवलकर यांनी उपस्थित राहून बालमानसशास्त्र या विषयाचे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “मुलांना मोबाईलपासून दूर करायचे असेल तर त्यांना वाचन, बुद्धिबळ आणि ज्ञान वाढवणारे खेळ याकडे वळवावे लागेल.”
नायर, हॉस्पिटलच्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्राजक्ता पाटकर यांनी पालक आणि मुलांच्या नात्यातील बदलांवर भाष्य करताना सांगितले की, “आजची जनरेशन आणि आधीची जनरेशन यामध्ये मोठा फरक आहे. पालक व्यस्त असल्याने मुलांमध्ये एकटेपणा आणि असुरक्षितता वाढते, त्यांना संवादाची गरज आहे.” चेतन नेरकर यांनी Access for Child या विषयावर अतिशय प्रभावीपणे विचार मांडले.तर ऋता सावंत यांनी पालक आणि मुलांच्या दृष्टिकोनातील फरक समजून घेणे का आवश्यक आहे, यावर सुंदर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्तम पद्धतीने करण्यात आले. प्राजक्ता सावंत (प्रशिक्षण समन्वयक) यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर पोस्टर्स आणि पथनाट्य उत्कृष्टरीत्या सादरीकरण करून मानसिक आरोग्याचे संदेश दिले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा आणि समाजकार्य क्षेत्रातील व्यक्तींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

0 टिप्पण्या