Top Post Ad

बेस्टच्या ताफ्यात 157 इलेक्ट्रिक पर्यावरणपूरक बसेसचा समावेश

 मुंबईच्या बेस्ट उपक्रमातील 150 नवीन इलेक्ट्रिक बसगाड्यांचा (Best) लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कुलाबा येथे पार पडलेल्या बेस्टच्या या पर्यावरण स्नेही इलेक्ट्रिक बस लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  पालकमंत्री आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, सोनिया शेट्टी यांच्यासह बेस्टचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपण 157 इलेक्ट्रिकल बसचं लोकार्पण आज करत आहोत, मुंबईतील 21 मार्गावर या बस धावणार असून 1.9 लाख मुंबईकर प्रवाशांना याचा लाभ घेता येईल. आपल्या मुंबईकरांना अधिक सोयीच्या गाड्या दिल्या पाहिजे आणि प्रदूषण कमी केलं पाहिजे. 5000 बस घेण्याचा निर्णय झाला., टप्पा टप्प्याने या येत आहेत. त्यातील 157 बस आज येत आहे,  बेस्टची सेवा एकप्रकारे जीवनवाहिनी आहे. कर्मचारी समाधानी असतील तर सेवा उत्कृष्ट होईल असे मानणारे आम्ही आहोत. सिंगल तिकीट वर आपण गेले आहोत, बेस्टला आपल्या पायावर उभ राहण्यासाठी नॉन फेअर बॉक्सची मदत होईल,  बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमा (BEST) मार्फत एकूण 150 नवीन 12 मीटर लांबीच्या संपूर्णपणे इलेक्ट्रिक बसगाड्‌या प्रवर्तित करण्यास सज्ज झाल्या आहेत. या बसगाड्या 'वेट लीज' पद्धतीने चालविल्या जाणार असून, त्यामुळे मुंबईतील पर्यावरणपूरक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे. यापैकी 115 बसगाड्‌यां PMI इलेक्ट्रो मोबिलिटी या उत्पादक कंपनीच्या असून त्या मुंबादेवी मोबिलिटी प्रा. लि. या कंत्राटदार ऑपरेटरमार्फत चालविल्या जातील. तर, 35 बसगाड्या ओलेक्ट्रा ग्रीनटेक लि. या उत्पादक कंपनीच्या असून त्या ईव्ही ट्रान्स महाराष्ट्र प्रा. लि. या ऑपरेटरमार्फत चालविल्या जातील. -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून जगभरातील लोक येथे येतात. त्यामुळे शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणे आवश्यक आहे,    मुंबईने आज पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे वळण घेतले आहे. तब्बल 157 इलेक्ट्रिक बसेस आज बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट)च्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यामुळे सुमारे तीन लाख प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त होणार आहे. या उपक्रमामुळे मुंबईचे आकाश स्वच्छ, आणि रस्ते हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करणार आहे. मुंबईत एकेकाळी ट्राम आणि बग्ग्या धावत होत्या, आज त्या ठिकाणी वातानुकूलित आणि पर्यावरण स्नेही इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व बसेस पर्यावरणपूरक बनवण्याचा आमचा संकल्प आहे. हे केवळ वाहतुकीतील सुधारणा नसून मुंबईच्या विकासाचे हरित वळण आहे. आम्ही 3,400 कोटी रुपये निधी दिला असून यंदा आणखी 1,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक बसेसच्या माध्यमातून प्रदूषणाला आळा बसणार आहे. ही फक्त सुरुवात असून, लवकरच आणखी मोठ्या प्रमाणावर पर्यावरण स्नेही वाहतूक सुविधा निर्माण केल्या जातील. ‘मुंबई वन ॲप’मुळे प्रवाशांना बसचे लाईव्ह लोकेशन, एकाच तिकिटावर विविध सेवा, तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध होतील.  बेस्ट कर्मचाऱ्यांना महापालिकेइतकाच दिवाळी बोनस देण्यात आला आहे. - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कंत्राटदार डेपो आणि बसगाड्‌यांची संख्या - मुंबादेवी मोबिलिटी प्रा. लि. (PMI) / ओशिवरा 82 / आणिक 33 / ईव्ही ट्रान्स महाराष्ट्र प्रा. लि. (Olectra) / कुर्ला 11 / गोराई 24 -/ एकूण 150.... या बसगाड्‌यांमध्ये प्रवेश करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्पची सुविधा देण्यात आलेली आहे. सदर 150 इलेक्ट्रिक बसगाड्‌या मुंबईतील 21 मार्गावर चालविण्यात येणार आहेत, ज्यामध्ये 21 प्रभागांचा समावेश आहे. बसगाड्‌यांची गुणवत्ता नियंत्रण केंद्रा‌द्वारे नियमित देखरेख केली जाईल. ही बससेवा अंधेरी (प.), जोगेश्वरी (प.), कुर्ला (पूर्व व पश्चिम), बांद्रा (प.), कांदिवली (प.) आणि बोरिवली (प.) या उपनगरी रेल्वे स्थानकांशी जोडली जाणार आहे. या बसगाड्या मेट्रो लाईन क्र. 1,2A, 7 आणि 3 (अॅक्वा लाईन) या प्रमुख मेट्रो मार्गाशी जोडणी साधून मेट्रो प्रवाशांना अखंड शेवटच्या टप्प्यापर्यंतची (Last-Mile) जोडणी उपलब्ध करून देतील. त्यामुळे सुमारे 1.9 लाख मुंबईकर प्रवाशांना दररोज दर्जेदार प्रवास अनुभवता येईल. 150 नवीन इलेक्ट्रिक बसगाड्यांचा समावेश हा मुंबईतील स्वच्छ, हरित आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हा उपक्रम राज्य शासनाच्या शाश्वत शहरी गतिशीलता वाढवून व कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com