Top Post Ad

संजय यशवंत साळवी यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न

 फळसप बौद्धजन सेवा संघ मुंबई या संघटनेचे कोषाध्यक्ष आयु. संजय यशवंत साळवी हे शासकीय मध्यवर्ती मुद्रालय, मुंबई येथून ३० वर्षांची प्रदीर्घ व निष्ठेची सेवा पूर्ण करून सहाय्यक पर्यवेक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने एक सेवानिवृत्ती कौटुंबिक व सन्माननीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.


सदर विशेष सोहळ्यास फळसप बौद्धजन सेवा संघ संघटनेचे अध्यक्ष व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारप्राप्त आयु. भगवान प. साळवी यांनी मनोगत व्यक्त करताना आयु. संजय साळवी यांच्या तीस वर्षाच्या प्रदीर्घ कार्यकर्तृत्वाचा व्यापक आढावा घेताना "संजय साळवी यांनी केवळ प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या नाहीत, तर विविध सामाजिक संघटनांमधून समाजाच्या उन्नतीसाठी मोलाची भूमिका बजावली. समाजावर त्यांचे प्रेम आणि बांधिलकी हे त्यांच्या कार्यातून स्पष्टपणे दिसून येते." असे गौरवोद्गार काढले व संजय साळवी यांना त्यांच्या पुढील सेवानिवृत्ती जीवनासाठी लक्ष लक्ष मंगलकामना व शुभेच्छा दिल्या.

सदर सोहळ्यास संजय साळवी यांच्या सुविद्य पत्नी सौ. सायली संजय साळवी, दोन अपत्य व सुनबाई यांची विशेष उपस्थिती होती सोबतच सदर सत्कार सोहळ्याला फळसप बौद्धजन सेवा संघ मुंबईचे ज्येष्ठ सल्लागार आयु. दशरथ द. साळवी, आयु. यशवंत शी. साळवी, आयु. सुभाष प. साळवी, उपसचिव आयु. संतोष बा. साळवी, फळसप नवतरुण मित्र मंडळ (रजि.)चे अध्यक्ष आयु. रुपेश गो. साळवी, बौद्ध विकास मंडळ मंडणगड चे सभापती सिद्धार्थ तांबे,

बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ४३२ चे अध्यक्ष महेंद्र मोहिते, चिटणीस अशोक मोरे, खजिनदार सदानंद तांबे, औद्योगिक कामगार संघटनेचे माजी चिटणीस अशोक कदम आणि इतर अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन संजय साळवी यांचा सत्कार करीत त्यांना सेवानिवृत्ती व पुढील सेवानिवृत्ती जीवनाच्या मंगलकामना व शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com