नेर ....एकूणच मानवी जीवन विकसित होत असताना तत्कालीन स्त्रियांनी अत्यंत महत्त्वाच्या भूमिका घेतलेल्या आहेत अशाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी रमाई आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांनी सुरू केलेल्या सामाजिक कामासाठी त्याग केला या रमाईच्या त्यागामुळे वर्तमान काळातील स्त्रियांना हक्क आणि अधिकार मिळाले असे प्रतिपादन मौर्य क्रांती संघ महाराष्ट्र राज्य महिला प्रकोष्ट अध्यक्ष प्रमोदिनीताई मुंदाने यांनी केले त्या लोकमत सखी मंचाच्या वतीने आयोजित श्रावण मास सोहळा कार्यक्रमा मध्ये बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा लोकमत सखी मंचाच्या तालुकाध्यक्ष शोभाताई कोठारी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य सुलोचनाताई भोयर,माजी नगराध्यक्ष वनिताताई मीसळे,शिवसेना (शिंदे गट) महिला जिल्हाध्यक्ष माजी नगरसेविका वैशाली मासाळ, माझी बांधकाम सभापती मायाताई राणे, शिवसेना (ठाकरे गट )नेर अध्यक्ष ज्योतीताई तंबाखे, भाजपा नेत्या वनिता खोडवे, रेणुका जयस्वाल प्रमुख पाहुणे होत्या
स्थानिक निर्मल बंसी लॉन येथे लोकमत सखी मंच च्या वतीने श्रावण मास सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना मुंदाणे म्हणाल्या की रमाई ने त्याग केल्यामुळे बाबासाहेब हिंदू कोड बिल लिहू शकले सविधान लिहू शकले हिंदू कोड बिल म्हणजे स्त्रियांच्या मुक्तीचा जाहीरनामा असून आपल्या हक्क अधिकाराचा दस्तावेज आहे याप्रसंगी माँ साहेब जिजाऊ क्रांतीमाता सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि अनेक स्त्रियांच्या कार्याची माहिती यावेळी मुंदाने यानी दिली यावेळी घेण्यात आलेल्या मंगळागौरी डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक नृत्यांगना डान्स ग्रुपने पटकावला त्यामध्ये सहभागी श्रुती धामणकर, जयश्री वानखडे,कीर्ती देशमुख,निशिगंधा बेंद्रे,स्वाती जामणकर द्वितीय क्रमांक अर्धांगिनी डान्स ग्रुप सहभागी वैशाली अलोने, नयना गुल्हाने, अर्चना तंबाखे, रोशनी गुल्हाने, प्रियंका बोराडे,सारिका गणोरकर,मनीषा शेटे, मोना लुनावत तृतीय क्रमांक धनज ग्रुप सहभागी पूनम भोयर, पूजा पिंगळे, कल्पना जोहले, प्रीती दाभिरे,शुभांगी गोल्हर, शीतल वानखडे श्रावण सोहळा उखाणे स्पर्धा यामध्ये प्रथम क्रमांक अनिता सूर्यवंशी,द्वितीय क्रमांक अश्विनी इंगळे श्रावण सोहळा फॅशन शो प्रथम क्रमांक सारिका दातीर द्वितीय क्रमांक शिल्पा गाढवे आदी विजेत्यांचे उपस्थित सगळ्यांनी अभिनंदन केले
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आलं सदर कार्यक्रमांमध्ये तालुक्यातील प्रत्येक गावातील महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्रद्धाताई सोईतकर, सुजाता मोहोड, माधवी देऊळकर ,छायाताई नहाले, मोना पिसे व प्रिया सोनोने आदींनी परिश्रम घेतले

0 टिप्पण्या