मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या कामाला तब्बल १८ वर्ष झाली मात्र तरी देखील या महामार्गाचे काम अद्याप पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी झाली आहे पेण ते नागोठणे या पट्ट्यात अनेक ठिकाणी रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून मागील १७ वर्ष या कोकणातील जनतेला या महामार्गावरुन खड्ड्यातूनच प्रवास करावा लागला आहे, तशीच अवस्था अठराव्या वर्षी देखील कोकणातील जनतेवर येऊ नये यासाठी १५ ऑगस्ट पूर्वी या महामार्गावरील पडलेले खड्डे सुस्थितीत करून रस्ता. पूर्ववत करा तसेच या महामार्गावरून जाणारे रायगड जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील सर्वच लोकप्रतिनिधी सरकार दरबारी आवाज उठवण्यात अपयशी ठरले आहेत का, असा सवाल शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हा वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी केला आहे.
ज्या काळात छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना नाशिकला जोडणारे सर्व महामार्ग व रस्ते सुस्थितीत केले त्याच काळात औरंगाबाद, सोलापूर, पुण्याला रोडणारे रस्ते देखील उच्च प्रतीचे झाले, त्याच पद्धतीने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते देखील विद्यमान खासदार व तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उत्तम प्रतीचे करून घेतले मात्र अपवाद राहिला तो रायगड जिल्हा व रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्णत्वावायत ना सरकारशी कधी भांडण्याचा प्रयत्न केला अथवा जाब विचारला, ना जनतेबरोबर रस्त्यावर उतरताना कोकणातील लोकप्रतिनिधी दिसले नाहीत. या महामार्गावर मागील अठरा वर्षांत अपघातात ज्यांचे बळी गेले आहेत व जे अपघातग्रस्त कायमस्वरूपी जायबंदी झाली आहेत त्या कुटुंबांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सुभाष मोरे यांनी केली आहे.
काम पूर्ण होण्या अगोदरच टोल नाके सज्ज झाले आहेत. मुंबई व राष्ट्रीय महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील सुकेळी खिंड व पोलादपूर जवळील चांढवे टोल नाका तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड चिपळूणमधील लोटे येथील टोलनाके बांधून तयार आहेत. रायगड जिल्ह्यातील कासू ते इंदापूर या 42.3 किलोमीटरच्या टोल वसुलीसाठी प्रवाशांना सुकळी खिंडीत वाटण्याची जोरदार तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चालू झालेली आहे. केवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची अधिसूचना निधणे बाकी आहे. आणि ती देखील लवकरात निघण्याची शक्यता खाजगी मध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात
प्रदीर्घ लांबीचा समृद्धी महामार्ग पाच वर्षात पुर्ण होतो. त्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले जातात. मात्र कोकणातील चाकरमण्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा मुंबई-गोवा महामार्गाचे काम मागील 18 वर्षापासून चालू असून अद्यापही पूर्ण होण्याचे चिन्ह दिसत नाही. कोकणातील लोकप्रतिनिधी केवळ आपआपला स्वार्थ साधण्याकरिताच संसदेत, विधानभवनात जातात काय असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. केंद्रीय मंत्री यानी में 2023 पर्यंत एक मार्गिका पूर्ण करू असे पाहणी दौऱ्यावर असताना आश्वासन दिले होते. परंतु ते पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले यानंतर राज्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी देखील आपल्या चार दौऱ्यादरम्यान कोकणवासीयांना खोटी आश्वासने देण्यापलिकडे काहीही केले नाही. 31 मे 2023 पर्यंत एक मार्गिका पूर्ण करू असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले असताना ते पूर्ण करण्यात अपयशी ठरले


0 टिप्पण्या