या देशाने आजपर्यंत दुधाच्या क्षेत्रातील श्वेतक्रांती पाहिली, पिकांच्या संदर्भातली हरित क्रांती पहिली. आणि आता महाराष्ट्राच्या विधानभवनात बसून ऑनलाईन जुगार खेळून या कृषिमंत्र्यांनी केलेली जुगार क्रांती ही पहिली. राज्याचा कृषिमंत्री हा शेती आणि शेतकरी यांच्या बद्दल आस्था असणारा असावा, त्या प्रश्नांची जाण असणारा असावा आणि त्यांच्या प्रश्नांना सोडवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला असावा अशी साधारण जनतेची अपेक्षा असते. दुर्दैवाने महाराष्ट्राला जो कृषिमंत्री मिळालाय त्याची शेतकऱ्यांबद्दल किती आस्था आहे हे याच्या आधी केलेल्या बेताल विधानावरून लक्षात येतच. शेतीचं ज्ञान त्यांचं त्यांना माहिती आणि प्रश्न सोडवण्याची त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती किती आहे हे त्यांनी सभागृहात बसून जंगली रमी सारखा जुगार खेळून सिद्ध केलं आहे.
शेती, शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नाशी जराही बांधील की नसणाऱ्या या कृषिमंत्र्याचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी ज्याला शेती संदर्भात खऱ्या अर्थाने जाण असेल आणि त्यांची शेतकऱ्यांच्या संदर्भात बांधिलकी असेल अशा व्यक्तीलाच ते खातं देण्यात यावं. वंचित बहुजन आघाडीचे ही ठाम आग्रही आणि महत्त्वाची मागणी आहे की माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम करणे अपेक्षित आहे त्याऐवजी सभागृहात बसून जर का ऑनलाइन जुगार खेळत असतील तर तो खेळण्यासाठी त्यांना मोकळीक शासनाने द्यावी, त्यांना मंत्रिपदाच्या कामात अडकवून ठेवू नये. जास्तीत जास्त वेळ त्यांना रमी खेळता येईल यासाठी तातडीने त्यांच्याकडनं राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांना या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी वंचित बहुजन आघाडीची आग्रही मागणी आहे.
सिद्धार्थ मोकळे... 8007009364
प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी
रोहित पवार यांनी कृषिमंत्री यांचा व्हिडिओ ट्विट करताना जंगली रम्मी पे आओ ना महाराज म्हणत कृषीमंत्र्यांच्या परिस्थितीची खिल्ली उडवली. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एक करण्याची वेळ आली तर आम्ही भाजप श्रेष्ठीना विचारू असं सुनील तटकरे यांनी म्हणल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी तटकरे यांना उत्तर देताना सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही, म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना, भाजप निर्णय घेत असल्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना काही काम शिल्लक राहिलेलं नाही आणि त्यामुळेच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना सभागृहात बसून रम्मी खेळण्याची वेळ आली असावी असा टोला लगावला.
जितेंद्र आव्हाड यांनी एक्स हँडलवरून ट्विट करत कोकाटे यांना ‘शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी’, असा खणखणीत टोला त्यांनी लगावला. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात सत्ताधारी आमदार काय काय करतात हे समोर येत असल्याची टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांविषयी उलटसूलट वक्तव्य करायचे. दुसरीकडे जंगली रमीमुळे अनेक आत्महत्या झाल्या आहेत. तोच खेळ मंत्री सभागृहात खेळत असल्यावर त्यांनी टीका केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी हे जनतेच्या बोकांडी बसलेल नतभ्रष्ट सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं सरकार पुन्हा होणार नाही. कोणाचीच परवा नसलेल हे सरकार आहे. शेतकरी कर्जाखाली दबलेला आहे. आठ ते दहा शेतकरी रोज आत्महत्या करत आहे. वन थर्ड शेतकरी हे पीक विम्याचे राज्य सरकार भरत होतं. आता पूर्णतः पिक विमा शेतकऱ्याला भरायचा आहे. मत घ्यासाठी एक रुपयात विमा आता मात्र तुमचं तुम्ही बघा अशी भूमिका सरकार घेत आहे, अशी टीका केली. भाजपवाल्यानी कोकाटे यांना केवळ नावालाच मंत्री केलाय. त्यामुळे यांना काम उरलेले नाही, म्हणून ते रमी खेळत आहे. किंवा अधिकार नसल्यामुळे यांना काही करायची इच्छा नसेल. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी अवस्था झाली आहे, चड्डी बनियान, लुंगी बनियान वाले मंत्री, गुंडांना सोबत घेणारे आमदार, काय चाललंय महाराष्ट्रात. वादग्रस्त वक्तव्य करणारे कृषिमंत्री यांना त्या पदावर ठेवायचं की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घ्यावा. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल कणव असेल तर अशा मंत्र्यांना ते त्या पदावर ठेवावं का हा विचार करतील, असे वडेट्टीवार म्हणाले.
0 टिप्पण्या