Top Post Ad

"संन्यस्त खडग "नाटकातून विश्वगुरू तथागत बुद्ध आणि भिक्खु संघ यांची बदनामी

प्रति,

मा. पोलीस आयुक्त महोदय,
मुंबई.
विषय : वि.दा. सावरकर लिखित "संन्यस्त खडग "नाटकातून विश्वगुरू तथागत बुद्ध आणि भिक्खु संघ यांची बदनामी केलेली असल्याने सदरील नाटक प्रदर्शीत करू देऊ नये.

महोदय,
आपणास या निवेदना द्वारे लक्षवेधी इच्छितो की विनायक दामोदर सावरकर द्वारा लिखित ”संगीत संन्यस्त खड्ग” (1931)नाटक 8 जुलै 2025 पासून महाराष्ट्रात मुंबई, नाशिक, पुणे या ठिकाणी नाट्य गृहात प्रदर्शित करीत आहेत. जाहिरात फलका द्वारे तारखा कळल्या. 8 जुलै ला रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी ( संध्याकाळी 7 वाजता), 12 जुलै ला पुणे येथील यशवंत चव्हाण सभागृह, संध्या. 5 वाजता. 13 जुलै ला नाशिक येथील कालिदास सांभागृहात, वेळ दुपारी 12.30 वाजता. आणि 25 जुलै ला विलेपार्ले येथील दीनानाथ मध्ये दाखविणार आहेत.
सुधीर फडके यांनी स्थापन केलेली सावरकर दर्शन प्रतिष्ठान असून या संस्थेद्वारे चित्तपावन मंडळी द्वारे हे नाटक हेतूपूर्वक प्रदर्शीत केले जात आहे. सावरकर यांनी सदरील नाटकामध्ये तथागत बुद्धाचे चरित्रहनन केले आहे तसेच बुद्ध धम्माची आणि संघाची बेदनामी केली आहे. या नाटकाची आम्ही सहिंता वाचली आहे. हे नाटक अत्यंत विकृत मानसिकतेतून सावरकर यांनी लिहिलेले आहे. हे नाटक प्रदर्शीत करून काय चित्पावन लोकांना काय महाराष्ट्रात आणि देशात दोन समूहात (चित्तपावन ब्राम्हण विरुद्ध बहुजन समाज ) भांडणे लावायचे आहे काय? *संदर्भ - समग्र सावरकर खंड ९, पान क्रमांक ११४ ते २१२ प्रकाशन २००० -२००१* वरून आम्ही या नाटकाला हरकत घेत आहोत. आम्ही का हरकत घेत आहोत याची सावरकर यांच्या साहित्याच्या आधार घेत विरोध दर्शवीत आहोत. सदरील नाटकात पुढील आक्षेपार्य बाबी आहेत:
  • १) शीलवान बुद्धांवर पत्नी यशोधरा शिवाय मधुरा, मंजुळा अशा अनेक स्त्रिया बुद्धांच्या आयुष्यात आल्या असा खोटा उल्लेख या नाटकात आहे– पान क्रमांक १२३
  • विश्वगुरू तथागत बुद्ध यांचे चरित्रहनन करण्यासाठीच सावरकरने हे नाटक लिहिले आहे.
  • २) तथागतांनी स्त्रियांना पापयोनी म्हणून अपमानित केल्याचा आरोप, पान क्रमांक १२९
  • सावरकर हे चित्पावन ब्राम्हण होते, त्यांनी आयुष्य भर बुद्ध धम्माचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा तिरस्कार, विरोध केलेला आहे. तथागत बुद्धाला महिला विरोधी दाखविणे हा दुष्ठ हेतू मनू, पुषयमित्र शुन्ग समर्थक सावरकरचा आहे.
  • ३) बुद्धांच्या पवित्र भिक्षु संघास भिक-मांग्या संघ संबोधून हिणवले आहे पान क्रमांक १३०
  • ४) भगवान बुद्धांनी भीक देणाऱ्यास भिकारी केल्याचा आरोप नाटकात केला आहे पान क्रमांक १३०
  • ५) बुद्धांच्या पवित्र भिक्षु आणि भिक्षुनी संघास कामसुखाचा आनंद उपभोगणारा संघ म्हंटले आहे.पान क्रमांक १३६
  • ६) ऐश्वर्या संपन्न व आळशी जीवन जगण्यासाठी स्त्री पुरुष संघात सामील झाल्याचा आरोप पान क्रमांक १५६-१५७
  • ७) बौद्ध भिक्खूंना टोळ, टोळधाड आणू म्हणून अपमानित केले आहे. पान क्रमांक १५७-१५८
  • ८) फुकटचे पोटभर खायला मिळते म्हणून लोकं बौद्ध भिक्षु संघात गेल्याचा आरोप केला आहे,पान क्रमांक १५७
  • ९) बुद्धांच्या मानवनिर्मित दुःखमुक्तीच्या धम्मशोधाला मनुष्यमात्राचे मरण टाळण्याचा मार्ग समजले आहे.पान क्रमांक १६०
  • १०) पत्नी वारलेल्या विदुरांना काम सुखाचा लाभ मिळण्यासाठी भिक्षुनी संघात सोय असल्याचा आरोप पान क्रमांक १६०-१८४
  • ११) बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी अपार कष्ट सोसणाऱ्या भिक्षु संघास श्रीमंत संघातील संन्यास संबोधले पान क्रमांक १८१
  • १२) वंदनीय स्थवीर भिक्षुना थेरडा व महास्थवीर भिक्षुना महानंदी संबोधून अपमानित केले आहे.पान क्रमांक १८४
  • १३) वैर सोडा शस्त्र खाली ठेवा दंडबलाहुन क्षमा हितकार आहे या बुद्ध वाणीला भंगड छदाचे वेड ठरवले आहे पान क्रमांक १७६
  • १४) बुद्धवाणीचे अनुसरणं करणाऱ्या शाक्य यांना नेभळट बुद्धधर्मीय शाक्य सावरकर ने म्हटले आहे.पान क्रमांक १७६
  • १५) विज्ञाननिष्ठ बुद्ध धम्माकडे जनतेने वळू नये म्हणून बुद्ध वेडास बळी पडू नये असा अपप्रचार सावरकर ने केला आहे पान क्रमांक १७६
  • १६) बुद्ध वाणी ऐकून वनाचा सिंह आपली नखाग्रे व दाढी कापली तर त्याच्या पाठीवर माकडे बसतीलअसा बुद्ध धम्मा चा उपहास सावरकर ने केला आहे.पान क्रमांक १७६ आणि १७७
  • १७) भिक्षुनी संदर्भात वाईट शब्दात टीका सावरकर ने केली आहे.पान क्रमांक १८२-१८४-१८५
  • १९) गांजापेक्षाही मादक ठरणारी भांगेची गोळी खाणारा भिक्षु नाटकात रंगून बुद्धांच्या पवित्र भिक्खू संघास घोर अपमानित केला आहे.पान क्रमांक १८५
  • २०) बुद्ध धम्मातील पवित्र ”निर्वाण ” संकल्पनेला नरक संबोधून पात्रा च्या तोंडी धिक्कर केला आहे.पान क्रमांक २११
  • २१) नाटककाराने कोसल सेनापती चंडाच्या मुखी तथागतांना नीच बुद्ध समजून त्याची जीभ कापायची भाषा वापरून विश्वगुरू बुद्धाचा घोर अपमान केला पान क्रमांक २१०.
  • 22) बुद्ध धर्मा मुळे देश गुलाम होईल, बुद्ध पलायन शिकवितो असा संदेश सावरकर ने या नाटकातून दिला आहे.
  • उपरोक्त बाबी अत्यंत गंभीर बाबी आहेत. या नाटकाच्या प्रदर्शनाला रोक लावण्यात यावी अन्यथा महाराष्ट्रात हिंसक वळण लागू शकते, law and order चा मुद्दा उपस्थित झाल्यास महाराष्ट्र सरकार याला जबाबदार राहील.
सावरकर दर्शन प्रतिष्ठान निर्मित नाट्य संपदा कला मंच यांच्या सहयोगाने रवींद्र माधव साठे, यांच्या मार्गदर्शनाखाली सावरकर लिखित व दीनानाथ मंगेशकर संगीत असलेले, *संगीत संन्यस्त खड्ग* नाटक रंगभूमीवर येत आहे. साठे आणि मंगेशकर यांच्या वर ऍट्रॉ्सिटी ची केस दाखल करा तसेच सर्व चित्तपावन कलाकारावर देखील ऍट्रॉ्सिटी केस दाखल करा. विनायक दामोधर सावरकर यांनी वेळो वेळी इंग्रज सरकार ची माफी मागितली होती. त्यांना इंग्रज सरकार त्याबद्दल इनाम म्हणून 60 रुपये पेन्शन देत होते. सावरकर यांनी त्यांच्या सहा सोनेरी पाने नामक पुस्तकात पुष्यमित्र शुंगने मौर्य राजा बृहद्रथ मौर्य ची तलवारीने तुकडे तुकडे करून हत्या केली त्याचे उघड पणे समर्थन केले आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय हा काकतालीय योग संबोधून छत्रपतींच्या कार्य कार्यावर प्रश्न चिन्ह निर्माण केला आहे.पेशवाईचा कट्टर समर्थक, मनूचा कट्टर समर्थक विनायक सावरकर याच्या समग्र साहित्या वर कायमची बंदी आणली गेली पाहिजे. नाही तर लोक चिडून सावरकर चे साहित्य गौरव पूर्वक जाळतील याची कृपया सरकारने दखल घ्यावी.
आपल्या संविधानाला आधार बनून काम करणारे सुजान नागरिक
सही.
डॉ विलास खरात, नई दिल्ली

 केवळ हिन्दुत्वावादाचा पुरस्कार करण्यासाठी  सावरकरांनी एक निश्चित हेतू मनात धरून हे लिखाण केले आहे . इथे त्यांचा रोख हा गौतम बुद्धाच्या जीवनतत्वाविषयी  तत्व आणि त्यातील त्रुटीवर टीका करणे असा स्पष्ट दिसत असल्याचे जानकारांचे मत आहे. संन्यस्त खड्ग, या नाटकाचा काळ ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील आहे. एका अर्थाने पौराणिक नाटक आहे. कपिलवस्तूचा इक्ष्वाकु कुलीन राजा शुद्धोधनपुत्र सिद्धार्थ, याने संन्यास घेतला आहे.  युद्धाआडून पशू आणि जीवांच्या हत्या सुरू आहेत, हे त्याला दिसते आहे. लोकांना यापासून परावृत्त करण्याचा मार्ग, म्हणजे नवा पंथ आणि विचार – हे समजून त्याने दीक्षा देण्यास सुरुवात केली आहे. शाक्य राज्यातील क्षत्रिय तरुण, दीक्षा घेत सुटले आहेत. अशाने आक्रमकांचा हल्ला झाल्यास राज्य वाचणे मुश्किल होईल अशी चिंता राज्याचा सेनापति विक्रमसिंह, शुद्धोधनाकडे बोलून दाखवतात.  दहा वर्षांनंतर सिद्धार्थ आपल्या वडिलांची भेट घेण्यास येत आहे. आपला राजमुकुट त्यास देऊन त्याचा कमंडलु स्वत:कडे घेण्याचा राजाचा मानस आहे. पण तिथे विक्रमसिंह आणि सिद्धार्थ यांच्यात विवाद होतो. या प्रसंगात सेनापतींच्या तोंडून लेखक बोलू लागतो आणि अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा बिनतोड प्रतिवाद करतो. अहिंसेचे तत्व टिकणार नाही असे बजावत विक्रमसिंह सिद्धार्थाची साथ स्वीकारतो.  आता विक्रमसिंहाचा पुत्र  वल्लभ सिंह सेनापति होतो. तो आणि त्याची पत्नी सुलोचना नवखे असतानाच राज्यावर कोसलाधीश आक्रमण करतात. तरुणांनी संन्यासदीक्षा घेतल्याने कपिलवस्तूचा पाडाव निश्चित असतो. तो टळावा म्हणून विक्रमसिंहाच्या संन्यस्त खड्गाला आवाहन केले जाते. अहिंसेविरूद्ध हिंसेच्या या लढ्यात  पुढील प्रवास, सावरकर आपल्या ‘सुष्टांच्या बचावासाठी हिंसा, या तत्वाचे महत्त्व स्पष्ट करतात. आणि नकळतपणे बुद्धाच्या अहिसेंला नकार देण्याचा प्रचार करतात. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com