प्रांजल खेवलकरांच्या संपर्कात काही दिवसांपुर्वी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी हे दोघे आले. या दोघांचीही पार्श्वभुमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. श्रीपाद यादववर या आधी बेटींग प्रकरणात गुन्हे दाखल असुन त्याला अनेकदा अटक देखील झालीय. तर निखिल पोपटाणी हा सिगारेटचा व्यवसाय करत असला तरी तो देखील बेटींगच्या दुनियेत बुकी म्हणून ओळखला जातो. दोघांनी प्रांजल यांच्या मित्रामार्फत त्यांच्याशी ओळख वाढवली आणि ते प्रांजल खेवलकर यांच्या सर्कलचा भाग बनले. शनिवारी देखील हे दोघे पार्टीत सहभागी झाले. यातील श्रीपाद यादवच्या सांगण्यावरुन दोन महिला तिथे आल्या आणि त्यापैकी एकीच्या पर्समध्ये अंमली पदार्थ सापडल्याचे समोर आले. सदर प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर प्रांजल खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी माध्यमांशी संवाद साधत सर्व माहिती दिली.
एफआयआरआणि पंचनाम्यामध्ये सगळं आहे. महिलेकडे गांजा आणि कोकेन सापडलं आहे त्याच महिलेला MCR देण्यात आली आहे. प्रांजलने कुठलही ड्रग्स सेवन केलं नव्हतं. प्रांजलचे महिलेशी कुठल्याही प्रकारचे संबंध नाहीत, हे सगळं प्रकरण बनावट आहे,त्या महिलेने हे अमली पदार्थ आणले होते. सगळ ट्रॅप रचला होता, असं विजयसिंह ठोंबरे म्हणाले. प्रांजल खेवलकर यांच्याकडे अंमली पदार्थ मिळून आलेला नाही. व्हिडिओ काढले गेले त्या संदर्भात पत्र देऊन उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. कुटुंबाची बदनामी करण्यासाठी व्हिडिओ देण्यात आले. अंमली पदार्थ सेवनाबाबतचा अहवाल का समोर येत नाही. व्हिडिओ शूटिंग मध्ये सगळ्यांना दिसत आहे की महिला पर्समधून अंमली पदार्थ काढत आहे, असं विजयसिंह ठोंबरेंनी सांगितले.
----------------------------------
नवाब मलिक ते एकनाथ खडसे व्हाया विद्या चव्हाण.. पोस्टचे शीर्षक वाचून अचंबित होवू नका. हे कनेक्शन समजून घेण्यासाठी पोस्ट नीट वाचा. विरोधी पक्षातील जो नेता सत्तेला शरण येत नाही. त्यांचे जावई, सूनबाई यांना हाताशी धरुन संबंधित नेत्याला गप्प बसवायचे. चारित्र्यहनन करुन सामाजिक प्रतिष्ठा धुळीला मिळवायची. शासकीय यंत्रणांचा गैरवापर करायचा. हा प्रकार २०१४ नंतर सर्रासपणे सुरु आहे.
पहिले उदाहरण घेऊ नवाब मलिक यांचे. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असताना त्यांना मॅनेज करण्याचे भरपूर प्रयत्न झाले. पण मलिक बधत नव्हते. मग नवाब मलिक यांचे जावई, समीर खान यांना जानेवारी २०२१ मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग्ज प्रकरणात अटक केली. नार्कोटिक्सने करण सजनानी नामक व्यक्तीच्या घरातून सुमारे १९४ किलो गांजा जप्त केला. करण सजनानीला समीर खान यांनी गुगल पे च्या माध्यमातून २०,००० रुपये दिले होते. म्हणून नार्कोटिक्सने NDPS कायद्याच्या कलम २७ (अ) अंतर्गत गुन्हा गुदरला. नार्कोटिक्सने असाही दावा केला की, समीर खान यांच्याकडे ड्रग्ज साठा केल्याचे पुरावे आहेत. मात्र, त्यांच्या घरी छापा टाकला असता कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत. समीर खान यांना अनेक महिने तुरुंगात घालवावे लागले. न्यायालयाने निकाल दिला तेव्हा गुन्हा रद्दबातल ठरवला. नवाब मलिक देखील देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात गेले. जेव्हा तुरुंगातून बाहेर आले तेव्हा सर्व राजकीय सेटलमेंट झाली होती. लोकांना दाखवण्यासाठी त्यांचा पाठिंबा न घेतल्याचे सांगितले. पण निवडणूक आयोगास अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस गटाने दिलेल्या आमदारांच्या यादीत मलिकांचे नाव होते.
दुसरे उदाहरण थोडक्यात घेऊ, राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांचे. खरं तर विद्याताई एक सरळमार्गी महिला नेत्या. त्यांच्या कुटुंबातील वैयक्तिक धुसफूस हा राजकारणाचा भाग नव्हता. पती पत्नीचे वाद अनेकदा विकोपाला जातात. तसेच त्यांच्या मुलाचे व सुनेचे वाद विकोपाला गेले होते. या प्रकरणाचा फायदा उचलत, त्यामधे राजकारण घुसवून विद्या चव्हाण यांना प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला. यासाठी आत्ताच्या घडीची दलबदलू एक महिलाच आघाडीवर होती. याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर नातवंडावर देखील होवू लागला. विद्याताईंनी पक्षांतर केले असते तर यातून त्यांची सुटका झाली असती. पण त्यांनी लढणे स्विकारले, ज्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागले.
आता सन्माननीय एकनाथ खडसे यांचे ताजे टवटवीत उदाहरण घ्या. मुळात माझ्या लेखी एकनाथ खडसे गांभीर्याने घेण्याचा विषय नाही. ते आज ज्या झाडाची फळे चाखत आहेत. त्या विषारी झाडाला पोसण्याचे व त्या झाडावर बसून माज करण्याचे पापक्षालन ते करत आहेत अशी माझी धारणा आहे. वास्तविक खडसेंचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांची स्वतंत्र अशी ओळख आहे. त्यांचा स्वतःचा व्यवसाय व स्वतःची प्रतिष्ठा आहे. पण त्यांचेवर कारवाई केल्यापासून गोदी मेडीया खेवलकरांचा उल्लेख 'एकनाथ खडसेंचे जावई' 'रोहीणी खडसेंचे पती' असाच करत आहे. यामागे हेतू बदनामीचा आहे. हे इथेच स्पष्ट होते आहे.
खेवलकरांचे प्रकरण अगदी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणासारखेच आहे. पोलीसांची प्रेस नोट पाहीली तर समजतेय की, २ ग्रॅम कोकेन आणि ७० ग्रॅम गांजा व दोन महीलांची उपस्थिती याची सांगड रेव्ह पार्टी अशी जोडली आहे. रेव्ह पार्टी म्हणजे काय? त्याची व्याख्या नीट तपासून बघा. पोलीसी कारवाईचा व मेडीया ट्रायलचा हेतू पूर्ण स्पष्ट होवून जाईल.
असो. तर सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असून खेवलकरांना २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खरं खोटं न्यायदेवता सांगेल. यथावकाश ते सर्वांच्या समोर येईलच. अशी राज्यातील अनेक प्रकरणे आहेत. प्रस्तुत पोस्ट मध्ये उपरोक्त ३ उदाहरणे प्रातिनिधिक स्वरुपाची आहेत.
राजकीय विरोध हवा. विरोधी विचारसरणी हवी. राजकारण म्हणून विरोधकाला चीतपट अवश्य करावे. पण कोणाच्या कुटुंबीयांना ब्लॅकमेल करण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करुन त्यास चाणक्यनिती म्हणवून घ्यायचे असेल तर ते चूक आहे. अशा कृत्यांना 'खोजे चाळे' म्हणता येईल.
फ्युरर जिवंत असताना ज्यू महिलांवर नाझी अंधभक्त अनन्वित अत्याचार करत होते. १२ वर्षानंतर दिवस पालटले. ज्याक्षणाला फ्युररचे वर्चस्व संपले. त्या क्षणाला नाझी अंधभक्त महिलांना सामान्य जर्मनांच्या १२ वर्षांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्याचा उल्लेख इथे करायलाही लाज वाटते इतका तो भयंकर प्रकार होता. अन्याय तितकाच करावा, जितका दिवस फिरल्यावर भविष्यात आपल्याला सहन करता येईल. याचा विसर सत्ताधाऱ्यांना पडलाय.
- * तुषार गायकवाड*

0 टिप्पण्या