Top Post Ad

लोकल रेल्वेसेवा मेट्रोसारखी एसी होणार; तिकिटात कोणतीही वाढ नाही

काही दिवसांपूर्वी मुंब्रा इथे मोठी दुर्घटना झाली. उपनगरीय लोकल सेवेला दरवाजे नसल्यामुळे अपघात होत आहेत. अतिशय वाईट परिस्थितीत लोक प्रवास करतात.आज दोन क्लास तयार केले आहेत.मेट्रो पूर्णपणे एसी आहे.दरवाजे बंद होतात.एसी असल्यामुळे चांगला प्रवास होत आहे.दुसरीकडे लोकल रेल्वे आहे. तिथे लोक दाटीवाटीत प्रवास करतात.दरवाजे नसल्यामुळे अपघात होतात .प्रधानमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांकडे मागणी केली की मेट्रोसारखे कोचेस हे लोकल रेल्वेला दिले पाहिजेत.जे एसी असतील आणि दरवाजे बंद होतील.हे कोचेस लावले तरी तिकिटात एक रुपयाची देखील वाढ केली जाणार नाही अशी मागणी केली आहे.आम्ही यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतो आहेत.लवकरच यासंदर्भात मुंबईत येऊन ते घोषणा करतील. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांना दिली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, लवकरच लोकल रेल्वेचे डबे मेट्रोसारखे एसी असतील.रेट्रोफिटिंग नाही.नवीन डबे असतील. चांगल्या पद्धतीचे डबे असतील.दरवाजे बंद होतील आणि डबे एसी असतील.तिकिटात कोणतीही दरवाढ केली जाणार नाही’.मेट्रो संदर्भातही मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली.त्यांनी सांगितले की,‘मेट्रो ३ चे दोन टप्पे खुले झाले आहेत.लवकरच कुलाबा ते आरे जेव्हीएलआर असा संपूर्ण मार्ग कार्यान्वित होईल.ऑक्टोबरपर्यंत हा मार्ग कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न असेल.विक्रोळी ते मंडाले, ठाणे ते कल्याण हे अन्य १३ मेट्रो मार्गाचे कामही प्रगतीपथावर आहे एकात्मिक तिकीट प्रणाली तयार केली आहे.ती यशस्वी झाली आहे. त्याच्या चाचण्या सुरू आहेत.एकात्मिक प्रणालीमुळे एक तिकीट घेतले तर या तिकिटावर मेट्रो,लोकल रेल्वे,मोनो,बेस्ट बस आणि वॉटर ट्रान्सपोर्ट अशा सगळ्या वाहतुकीच्या माध्यमातून प्रवास करता येणार आहे.हे तिकीट व्हॉट्सअपवर देखील उपलब्ध होणार आहे’.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com