कर्तबगार व्यक्तीच्या कर्तृत्वाचं मुल्यमापन करण्यासाठी ज्या कसोट्या आहेत. त्यामध्ये ऊच्च शिक्षण घेणारे संशोधक विद्यार्थी विद्यापीठात अनेक कसोट्या लावून आणि पुरावे सादर करुन आपला संशोधन प्रबंध सादर करतात आणि पीएचडी अर्थात आचार्य पदवी संपादन करतात...!!
वंचित बहूजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जीवनातील ४३ वर्षातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व किती मोठे आणि महत्वपूर्ण आहे याची साक्ष पटविणारे काही दाखले महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद,आणि संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती या तीन विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी दिले आहेत....!!
- अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वावर पीएचडी अर्थात आचार्य पदवी मिळविणारे ४ प्राध्यापक आहेत...!!
- १) डॉ. गजानन गजभिये ( सिल्लोड. ह. मु. संभाजी नगर.)
- मो. नं. 9422568919
- मार्गदर्शक :-- डॉ. आर के. क्षीरसागर.
- विषय:-- भारिप बहूजन महासंघाची भुमिका आणि त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव.
- विद्यापीठ :-- डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद.
- २००९ साली पीएचडी प्रदान करण्यात आली.
- २) डॉ. बलभीम जयराम वाघमारे. ( नांदेड.)
- मो. नं. 9421769073.
- मार्गदर्शक :-- डॉ. सुनील दाते.
- विषय :-- भारतीय राजकारणातील बहूजनवादी पर्याय.
- भारिप बहूजन महासंघाचा चिकित्सक अभ्यास.
- विद्यापीठ:-- डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद.
- २०११ साली पीएचडी प्रदान करण्यात आली.
- ३) डॉ. प्रज्ञा रघुनाथ रुईकर (साळवे) औरंगाबाद.
- मो. न. 9421395359.
- मार्गदर्शक :-- ए. एस. शिंदे.
- विषय :-- अॅड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा अभ्यास.
- विद्यापीठ:-- डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद.
- २०१२ साली पीएचडी प्रदान करण्यात आली.
- ४) डॉ. रमेश दामोदर इंगोले.(वाशिम ह. मू. अकोला.)
- मो. नं. 9373528689.
- मार्गदर्शक :--डॉ.डब्ल्यू. एस. वासनिक.
- विषय :-- भारिप बहूजन आघाडीच्या राजकारणाचा विश्लेषणात्मक अभ्यास. ( विशेष संदर्भ अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्हा. १९८४ ते २००९.)
- विद्यापीठ :-- संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती.
- २०१५ ला पीएचडी प्रदान करण्यात आली.
अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वावर पीएचडी करीत असलेले दोन संशोधक...!!
५) अमरदीप शामराव वानखडे. (अकोला. ह. मु. औरंगाबाद.)
मो. नं 9595892542.
मार्गदर्शक :- डॉ. दिनकर एम. माने.
विषय :--प्रबुद्ध भारत पाक्षिकातील प्रकाश आंबेडकरांची पत्रकारिता एक अभ्यास. (२०१७ ते २०२४.)
विद्यापीठ :-- डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद.
६) अॅड. संदेश मधुकर धाडसे.( अकोला.)
मो. नं. 9325509016.
मार्गदर्शक :-- डॉ. विनोद खैरे.
विषय :-- अॅड प्रकाश यशवंत आंबेडकर यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकीय व सामाजिक योगदानाचा विश्लेषणात्मक अभ्यास.
विद्यापीठ :-- संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती.
नोंदणी. (२०२१--२०२२)
महाराष्ट्रातील पुणे,औरंगाबाद,आणि अमरावती या तीन विद्यापीठात आता पर्यंत एकंदरीत ७ संशोधकांनी वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकरांच्या कर्तृत्वावर संशोधन केले आहे आणि त्या विद्यापीठाने त्या संशोधनाला मान्यता देऊन अॅड प्रकाश आंबेडकरांच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे...!! अॅड बाळासाहेब आंबेडकर यांची समकालीन राजकीय पुढारी यांच्या सोबतं तुलना केली तर असे लक्षात येते की,आताच्या काळात एकही राजकीय पुढारी एवढा कर्तृत्ववान दिसतं नाही की, ज्यांची संशोधक विद्यार्थ्यांनी दखल घेतली आहे. तसेच राजकीय पुढारी आणि पक्ष म्हणून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर प्रभाव पाडू शकेल अशी त्यांनी प्रभावशाली कामगिरी केली आहे....!!
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नांव घेऊन राजकीय फडात राजकारण करणारे अनेक आहेत. मात्र कर्तृत्व काय.? असा प्रश्न उपस्थित केला की, ठणठण गोपाल....!! सामाजिक क्षेत्रात काम करणारेही अनेक आहेत मात्र तुमच्या कर्तृत्वाची कुणी दखल घेतली का.? उत्तर नकारार्थी मिळतेय....!! वैचारिक बांधिलकी जपतं, स्वाभिमानी बाणा कायम ठेवतं. १९८२ पासून आजपर्यंत सातत्याने ४३ वर्षे राजकीय फडात आपली भूमिका घेऊन अॅड बाळासाहेब आंबेडकर हे एक हाती किल्ला लढवितं आहेत. त्यांनी राजकीय फडात जे जे प्रयोग केले त्याचा परिणाम राजकीय आणि सामाजिक पातळीवर किती आणि कसा पडला आहे त्याचे मुल्यमापन करीत आतापर्यंत ७ संशोधकांनी पुराव्यासहीत त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. आणि विद्यापीठाने त्याला मान्यता दिली आहे...!! समाज परिवर्तनाच्या लढ्यातील योद्धा म्हणून अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनातील ४३ वर्षे समाजासाठी समर्पित केली आहेत आणि सोबतंच फार मोठा त्याग सुद्धा त्याला जोडला आहे आणि म्हणून त्यांच्या कर्तृत्वाला झळाळी आली आहे....!!
सत्तेतील तुकडा किंवा भीक. त्यालाच सत्ता हवी असे गोंडस नांव देऊन बुद्धी भेद करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि समुहातील काही जण त्याला बळी सुद्धा पडत आहेत. अशाच हव्यासापोटी युती किंवा आघाडी करा म्हणून दबाव तंत्राचा वापर करीत प्रसंगी बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव अंगावर झेलतं अॅड बाळासाहेब आंबेडकर आपल्या भुमिके पासून तसूभरही ढळले नाहीत....!! ज्यांनी संविधानाचे वेळोवेळी लचके तोडले आहेत असे ढोंगी राजकीय पक्ष आणि पुढारी आज संविधान बचाव चा नारा देत संविधानवादी जनतेची घोर फसवणूक करीत आहेत आणि मनुस्मृती प्रणित कायद्यांना समर्थन देतं आहेत. हा विरोधाभास समजून न घेता संविधानवादी जनता भरकटलेल्या अवस्थेत वावरतेय....!! अशा वेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रात परिणाम कारक परिवर्तन घडवून आणणारा कर्तृत्ववान नेता समुहाला हाक देतं असेल तर समुहाने ऐकीने त्या नेतृत्वाच्या पाठिशी खंबीरपणे ऊभे राहिले पाहिजे ही काळाची गरज आहे....!!
- भास्कर भोजने.

0 टिप्पण्या