Top Post Ad

दुकानंच नाही तर शाळाही बंद करू,.... राज ठाकरेंचा मराठीच्या मुद्द्यावरुन थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

 राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषासूत्री आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार असे मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे स्पष्ट केले आहे. यावर सरकारला आत्महत्या करायचीच असेल तर करा. पण, महाराष्ट्रात इयत्ता 1 लीपासून हिंदी सक्तीची करण्याचा  तुम्ही फक्त प्रयत्न तर करून बघा, दुकानंच नाही तर शाळाही बंद करू, असा इशाराच राज ठाकरेंनी मिरा भाईंदर येथील सभेतून दिला. महाराष्ट्रातील शाळेत शासनाने इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्राची सक्ती केल्यावरुन मुंबईसह महाराष्ट्रात मनसैनिकांनी या निर्णयाला मोठा विरोध केला. त्यावरुन, राज्यात सुरू असलेल्या वादाचे पडसाद हिंदी विरुद्ध मराठी असे पाहायला मिळाले. येथील मिरा भाईंदरच्या  जोधपुर स्वीट आणि नमकीन दुकान मालकाला मनसे सैनिकांनी मारहाण केल्यानंतर मिरा रोडमध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर, मराठी व अमराठी असे मोर्चे मिरा भाईंदरमध्ये निघाल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. एकीकडे मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मिरा भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चालाही मोठा प्रतिसाद मिळालं. त्यानंतर, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिरा रोड येथे जाऊन जाहीर सभा घेतली. सभेच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरुन थेट  मुख्यमंत्र्यांना इशारा दिला. 

  महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतो, कोणाच्या दबावाखाली, तुमच्यावर कोण दबाव टाकत आहे? केंद्र सरकारकडून हा दबाव पहिल्यापासून टाकला जात आहे, काँग्रेस सरकार असतानाही तोच दबाव टाकला होता, असे म्हणत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा दाखला राज ठाकरेंनी दिला. मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता, गुजराती व्यापारी आणि गुजराती नेत्यांचा होता. आचार्य अत्रे यांचे पुस्तक वाचत असताना मला कळले,  ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रात आंदोलन झाले, मोरारजी देसाई यांनी गोळ्या घालून मराठी लोकांना ठार मारले.  यांचा मुंबईवर डोळा आहे, हे तुम्हाला चाचपडून बघत आहेत. हिंदी भाषा आणली तर बघू मराठी माणूस जिवंत आहे का, जर तो शांत दिसला तर हिंदी भाषा आणायचा पहिला प्रयत्न असेल, हळू हळू मुंबई गुजरातला मिळवायची हा यांचा प्रयत्न आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये, हे सर्वप्रथम वल्लभभाई पटेल यांनी म्हटलं होतं, असा इतिहासही राज ठाकरेंनी सांगितला.


   मुंबईला हात लावण्यासाठी मोठं षडयंत्र सुरु असल्याचा मोठा दावाही ठाकरे यांनी यावेळी केला. हे सगळं षडयंत्र तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. मुंबईला जर हात लावायचा असेल तर या ठिकाणचे मीरा भाईंदर पासून ते पालघरपर्यंतचे सर्व मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे आहेत. मी गेले 20 वर्षे ओरडून, बोंबलून बोंबलून सांगतोय की, ही नुसती माणसं येत नाहीयत तर ते मतदारसंघ बनवत आहेत. 
हे मतदारसंघ बनवून तुम्हाला लांब फेकून देणार आणि नंतर सांगणार आमचाच खासदार, आमचेच आमदार, आमचाच महापौर असं करुन हे मुंबईपर्यंत पोहोचणार आणि हा आख्खाचा आख्खा पट्टा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाटोप सुरु आहेत. हे आज नाही, पूर्वीपासून सुरु आहे. पूर्वी त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. पण आज लपूनछपून या सगळ्या गोष्टी सुरु आहेत. हे काय षडयंत्र आहे ते आपण नीट ओळखा. समजून घ्या. हा सहज आलेला माज नाहीय. हे तुमच्या अंगावर येतात आणि बोलतात मराठी नाही बोलणार, हा माज तिथून आलेला आहे", असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.

हिंदी चॅनेलवाले हे सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालचे ढेकणं आहेत. मुंबईत आणि महाराष्ट्रात काहीही झालं तरी हे लोक कोणाच्या सांगण्यावरुन आणि स्वतःच्या रागातून पेटून उठतात.
२८ सप्टेंबर २०१८ गुजरातमध्ये बलात्काराची घटना घडली तेव्हा २० हजार बिहारी लोकांना राज्यातून बाहेर काढलं, तेव्हा बातम्या झाल्या का? यांच्या राज्यात ते वाट्टेल तसं करणार बाहेरच्या लोकांना हाकलून देणार, दुसऱ्याच्या राज्यात येणार.. एका मिठाईवाल्याच्या कानफटात मारली तर देशाची बातमी कशी होते? हे काय प्रकारचं राजकारण सुरुय, हे मराठी माणसाने लक्षात घेतलं पाहिजे.
हिंदी भाषेला २०० वर्षाचा इतिहास आहे. मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी १४०० वर्षांचा इतिहास असावा लागतो. हिंदी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला अजून १२०० वर्षे बाकी आहेत. हिंदीने २५० पेक्षा जास्त भाषा मारुन टाकल्या आहेत. त्यामुळे ही भाषा आम्ही महाराष्ट्रात सक्तीची होऊ देणार नाही.असे ठाकरे यांनी सरकारला बजावले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com