तथागत गौतम बुद्ध यांच्या अभूतपूर्व क्रांतीनंतर तत्कालीन व्यवस्थेत अनेक बदल झालेत आणि या परंपरेत तथागतापासून बाबासाहेबांपर्यंत अनेक सम्राट चक्रवर्ती सम्राट होऊन गेलेत या सम्राटांची चक्रवर्ती सम्राट यांची आपण वारस आहोत आपला हा दैदिप्यमान गौरवशाली भव्य दिव्य असा इतिहास आठवा आणि त्यानुसार आपलं आचरण असू द्या असे आव्हान प्रा. जगदीश पाटील यांनी केले ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. नेर, नालंदानगर येथील नालंदा बुद्धविहारात प्रज्ञाशोध :आंबेडकरी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी विचार मंच, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व नालंदा बुद्धविहार कमिटी यांच्यावतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या151व्या जयंतीनिमित्ताने 28 जून रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक जगदीश पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून वनिता मोरे/इंगोले व आत्मारामजी ब्राह्मणे हे होते
यावेळी बोलताना पाटील सर म्हणाले बहुजनांनो तथागतांपासून सम्राट बिबिंसार,चक्रवर्ती सम्राट अशोक,वाकाटक राजे, राजा मिलिंद,राजे सातवाहन असा राजे महाराज्यांचा आपला इतिहास आहे. हा इतिहास आठवा आणि आपणही गौरवशाली इतिहास निर्माणासाठी प्रयत्न करत रहा असे आवाहन प्रा. जगदीश पाटील यांनी केले. यावेळी अशोक गणवीर आणि अरुणाताई इंगोले यांनी आपलं मनोगत व्यक्त केले तर वैभव मेश्राम यांनी आपली एक विद्रोही कविता सादर केली कार्यक्रमाच्या सुरुवातीला नालंदा बुद्धविहाराला लोखंडी गेटचे दान दिल्याबद्दल नालंदा बुद्धविहार कमिटीच्या सर्व सभासदांसह उपस्थित सर्वांनी आत्माराम जी ब्राह्मणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच राजीव डफाळे यांनी 22 प्रतिज्ञांचे वाचन केले कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर शरद मोरे प्रास्ताविक नाना ढबाले आभार प्रदर्शन भीमराव काळे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन दिनकर इंगोले ज्ञानेश्वर सरदार डॉ.नरेंद्र अघम यांनी केले याप्रसंगी रमेश दौलत सोनोने, सुरेश तुकाराम चौधरी, दिलीप देवाजी चव्हाण, संघमित्रा दिलीप चव्हाण, शोभा दिलीप इंगोले, दीक्षा अशोक गणवीर, शशिकला शालिक इंगोले, तनुजा नाना ढबाले, शारदा अशोक अघम, प्रीती रुपेश पानतावणे, प्रीती कीर्तिराज चौधरी, सीताबाई दादाराव भगत आदिंसह परिसरातील गनमान्य उपस्थित होते

0 टिप्पण्या