Top Post Ad

पत्रकारांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद;

 अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विशेष सहकार्याने मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, आझाद मैदान येथे १० जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वॉकहार्ड रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या अधिपत्याखाली असलेल्या या शिबिरात सुमारे २०० पेक्षा अधिक पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी आपली वैद्यकीय तपासणी केली.


या शिबिराचे उदघाटन रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थचे अध्यक्ष कमल चोक्सी यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने फीत कापून करण्यात आले. यावेळी क्लबचे सचिव गिरीश वालावलकर, उपाध्यक्ष अशोक जोशी, माजी अध्यक्षा नफीसा खोराकीवाला, फिरोज कच्छवाला, सदस्या रसिदा अनिस, माधवी तन्ना, नर्गिस गौर, तसेच वोक्हार्ट फाउंडेशनच्या डायरेक्टर समिना खोराकीवाला, व्यवस्थापक जितेश रांभिया आणि अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष सुभाष देसाई तसेच पत्रकार विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


शिबिरात विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये हृदयविकार व रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, ईसीजी, रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी, नेत्र तपासणी, तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैयक्तिक सल्ला यांचा समावेश होता. तपासणीनंतर गरजूंना मोफत औषधांचे वाटप आणि चष्म्यांचे वितरणही करण्यात आले.आरोग्य सेवेत सहभाग घेतलेल्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी अत्यंत समर्पित भावनेने उपस्थित पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची सेवा केली. संपूर्ण शिबिर अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.


पत्रकारांच्या व्यस्त आणि तणावपूर्ण दिनचर्येमध्ये वेळेवर आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे, यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरतात. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यातही अशाच स्वरूपाची शिबिरे राबवली जातील, अशी ग्वाही वोक्हार्ट फाउंडेशनच्या समिना खोराकीवाला यांनी दिली.


पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घेतलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, भविष्यात अधिक व्यापक प्रमाणावर अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.  राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन पत्रकार विभाग अध्यक्ष रमेश अवताडे, सरचिटणीस शिरीष वानखेडे, उपाध्यक्ष नरेंद्र घोलप, सचिव सुरेश गायकवाड संघटक सचिव अल्पेश म्हात्रे, कार्यकारी सदस्य सुरेश ढेरे आणि सुबोध शाक्यरत्न यांच्या अथक परिश्रमाने हा  उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com