सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला ही गोष्ट ऐतिहासिक आहे. कित्येक वर्षांनी आंबेडकरी जनतेच्या खूनासाठी न्याय मिळतोय. यासाठी स्वत: बाळासाहेब आंबेडकरांना काळा डगला चढवावा लागला. म्हणून न्याय मिळाला. नाहीतर कोर्टात केस गेली कि पोलिसांनी पुरावे पातळ केलेले. साक्षीदार फितवलेले. सरकारी वकीलांनी मुद्देच मांडायचे नाहीत आणि आरोपीसाठी जातभाईंनी, सरंजाम्यांनी महागडे वकील दिल्याने न्यायच मिळत नसे. खैरलांजी हत्याकांडात अकरा वर्षाच्या लहान अंध मुलाला जमावाने हाल हाल करून ठार मारले. प्रियंका आणि सुरेखा भोतमांगेंची जमावाने विटंबना केली. हाल हाल करून मारले. दुसर्या मुलाला मारून टाकले. आणि मृतदेहांची विल्हेवाट लावली. इतकं क्रूर हत्याकांड होऊनही रेअरेस्ट ऑफ रेअर केस नाही असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. दुसरीकडे आरूषी आणि अन्य हत्याकांडात प्रेसने लावून धरल्याने पुन्हा चौकशी झाली. अजून एकदा चौकशी झाली. निकाल दिला असतानाही पुन्हा केस ट्रायलसाठी उभी राहिली. हा विरोधाभास आंबेडकरी जनता मूकपणे बघत असताना तिला काय वाटत असेल ?
एकच देश आहे आणि एकच संविधान आहे. एकच कायदा आहे. न्यायालयांना सरळ सरळ दिसत असतं कि तपास नीट झालेला नाही. काही केसेस मधे न्यायालय सु मोटो अ
ॅक्शन घेऊन स्वत:च तपासाचे आदेश देते. पण एकाही दलित अत्याचार केस मधे अशी प्रो अ
ॅक्टिव्ह ट्रायल पाहण्यात आलेली नाही. कायदे असून ते धाब्यावर कसे बसवले जातात हेच आंबेडकरी जनतेला दाखवून दिले गेले.
हे दाखवणारे कोण होते ? भाजप - शिवसेना तर होतेच. पण कॉंग्रेस, राष्ट्रवादी, डावे पक्ष हे सगळे यात सामील आहेत. कुणीही धुतल्या तांदळाचे नाहीत. मध्यंतरी सुनील खोब्रागडे नामक इसमाने बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करताना त्यांनी आजवर काळा कोट घालून कुणाला न्याय मिळवून दिला असा सवाल केला होता. पण या इसमाने ज्यांची तळी उचलून धरली त्यांची सरकारे असताना त्यांनी किती न्याय मिळवून दिला याचा हिशेब कोण विचारणार ?
आंबेडकरी जनतेची स्वायत्त शक्ती असली पाहीजे. राजकीय ताकद असली पाहीजे या कांशीराम यांच्या विचारांचा आहे. आज बसपा दुर्बल झाली तर वंचितला सपोर्ट केला पाहीजे या विचाराचा आहे. बाबासाहेबांनी कॉंग्रेस जळते घर आहे हे सांगितलेले आहे. त्यामुळे आम्ही या जळत्या घरापासून दूर आहोत. पण या घराशी घरोबा करून आमच्या लोकांना आगीत ढकलणार्यांनी आमची मतं मिळवून दिल्यावर आणि जळत्या घराला सत्तेत बसवल्यावर तरी त्यांनी किती प्रकरणात न्याय मिळवून दिला हे नको का बघायला ? जर न्याय देण्यात हे अपयशी ठरत असतील तर कोणत्या तोंडाने हे त्यांच्यासाठी मतं मागून जे सत्तेत नाहीत त्यांना हिशेब विचारतात ? बाळासाहेबांनी एका प्रकरणात न्याय मिळवून दिला. पण ते एकटे कितीसे पुरे पडणार ? अशी शेकडो प्रकरणे खेडोपाडी घडत असतात. कॉंग्रेस, राष्ट्रवादीचेच सरंजामी अन्याय करत असताना ते न्याय कसे देणार ?
अशा प्रत्येक प्रकरणात बाळासाहेब आंबेडकरांनी आपले आयुष्य कोर्टात घालवावे आणि खोब्रागडेंनी अन्याय करणार्यांना सत्तेत बसवून मलिदा खायचा का ? २०१९ ला पुन्हा एकदा संधी मिळाली तेव्हां अकरा खूनाची प्रकरणे घडली, अरविंद बनसोड पासून ते भीमा कोरेगाव प्रकरणात काय न्याय झाला ? खोब्रागडे यावर बोलत नाहीत. ना अंधारे बोलतात. ना विश्वंभर चौधरी बोलतात. ना संग्राम पाटील, दोन्ही आवटे, सुनील तांबे, चोरमारे, योगेंद्र यादव, राष्ट्र सेवा दल, निखिल वागळे, अंतिम सरोदे हे कुणीही बोलतात. न्याय मिळवायचा तर निव्वळ वकीलांनी लढा देऊन चालत नाही. पोलिसांपासून यंत्रणा सडली आहे तिला लायनीवर आणयचे तर आम्हाला सत्तेत यावे लागेल. निव्वळ युती आघाड्या करून आमची सर्व मतं देऊन एक जागा घेऊन यंत्रणा बदलत नाही. लाचारीची युती करून पोलीस आमचे ऐकत नाहीत. आम्हाला एक आणि दोन जागा मिळाल्या तर त्या निवडून आणल्या जात नाहीत. आणल्याच तर एक आणि दोन जागांमुळे सरकारला धारेवर धरता येत नाही. ते लाचार राहतात. नाहीतर त्यांना घबाड देऊन आपल्यात घेतले जाते.
आमच्या मतांवाचून हे सत्तेबाहेर राहतात. आमची मतं मिळाली कि यांना बहुमत मिळते ही आमच्या मतांची किंमत. पण जागा सोडताना ही किंमत दिली जात नाही. जर आमच्या मतांवाचून तुम्हाला सत्ता मिळणार नसेल तर जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करताना आम्हाला इतक्या जागा सोडल्या पाहीजेत कि त्या निवडून आणल्याशिवाय तुम्हाला सत्ताच मिळणार नाही. त्या जागा पाडल्या तर यांना सत्तेचे सोपान मिळणार नाहीत. आणि निवडून इतक्या आल्या पाहीजेत कि दलित अत्याचार प्रकरणात न्याय दिला नाही तर आम्ही पाठिंबा काढून सरकार पाडू शकू. १४५ हा बहुमताचा जादूई आकडा आहे. एकूण जागा २८८ आहेत. जर सवर्णांना आम्ही २८० जागा दिल्या आणि आम्हाला आठच जागा मिळाल्या तर आमच्या मतांवर यांना सहजच १४५ हा आकडा पार करता येतो. आमच्या आठ जागा निवडून आल्या नाहीत तरीही यांचे सरकार बनते. मग यांची आपसातच साठमारी होऊन हे एकमेकांचे हित बघत तडजोड करतात. मविआचे सर्व घटक पक्ष आम्हाला फाट्यावर मारतात. म्हणूनच आम्हाला जर ४० जागा मिळाल्या तर आमच्या जागा पाडून यांना चालणार नाही. यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर आम्ही यांना मत देऊन आमचा फायदा काहीही नाही.
२०२४ ला आम्ही यांना ३८ जागा लोकसभेला दिल्या. सोमनाथ सूर्यवंशीचा खून पोलिसांनी केला. मविआने हा प्रश्न लेखी स्वरूपात संसदेत का मांडला नाही ? बाईट्स देऊन केस निकाली निघते का ? राहुल गांधींकडे वकीलांची फौज आहे, उद्धव ठाकरेकडे वकीलांची फौज आहे, शरद पवारकडे वकीलांची फौज आहे. अंतिम सरोदे मानवतेच्या नावाखाली कोर्टात जात असतो. यातले कुणीही सोमनाथ सूर्यवंशीसाठी कोर्टात का गेले नाहीत ? सोमनाथ सूर्यवंशी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या आणि संविधानाच्या प्रतिकृतीसाठी शहीद झाला. बाबासाहेबांचे नाव घेऊन आणि संविधानाचे पुस्तक दाखवून मविआच्या लांडग्यांनी आमची मतं घेतली, मग यांनी कोर्टात जाऊन लढा का दिला नाही ? हे फक्त पक्षफुटीसाठीच न्यायालयात जातात का ? आमची मतं घेतली मग आमच्या प्रश्नांसाठी न्यायालयात जात नाही का ? आमचा प्रश्नच नाही. तुम्ही स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवता, संविधानवादी म्हणवता. मग सोमनाथ सुयवंशीला न्याय का मिळवून दिला नाही.
सत्तेत असताना २००४ ते २०१३ या काळात ४५०० प्रकरणात न्याय दिला नाही, मग सत्ता नसल्यावर काय देणार ? सत्ता नसताना बाळासाहेब आंबेडकरांना तुम्ही दलालांमार्फत केस का लढला नाही म्हणून निर्लज्जपणे प्रश्न विचारता. मायावतींवर बोट उगारता.
तुमचे काय ?
बाळासाहेबांनी न्याय मिळवून दिला.
मायावती सत्तेत असताना पेंडींग प्रकरणे पुन्हा हिअरिंग आली आणि घाऊक न्याय मिळाला. कॉंग्रेसने न्याय न दिलेल्य़ा सर्व प्रकरणात न्याय मिळाला. भाजपने न्याय न दिलेल्या प्रकरणात न्याय मिळाला. जमिनी मिळाल्या. दलित उद्योगपती निर्माण झाले. यातलं मविआने काय केलं ? फक्त आमची मतं घ्यायची आणि नाही मिळाली कि बी टीम म्हणून बोंब मारायची. तुमच्या दारावर जोहार मागायला यायचीच लायकी आहे का आमची अजून ? जे मागायला जातात तेच भडवे तुमच्यासाठी मतं मागतात. सोमनाथ सूर्यवंशी सारखी प्रकरणे घडायचे तेव्हांच बंद होईल जेव्हां आमची स्वतंत्र सत्ता येईल किंवा आमचे एव्हढे आमदार निवडून येतील,ज्यांची संख्या सरकार बनवण्याइतकी असेल. आमच्याशिवाय यांची सत्ता डळमळीत असेल तेव्हांच पोलीस दल हालेल. पोलीस हलले कि अत्याचायांना धाक बसेल. धाक असला कि अत्याचार होणार नाहीत. आज आम्ही यांना आमचं लंगोट काढून देतोय. आमचा एकही निवडून आला नाही तरी चालेल पण भाजपला रोखण्याची जबाबदारी आमच्या खांद्यावर घेऊन यांना निवडून देतोय. मग आमची राजकीय ताकदच शून्य होते. दयेवर रहावं लागतं.
हे वर्षानुवर्षे चालले तर न्य़ाय मिळणारच नाही. पुन्हा जर हेच होणार असेल तर न्यायाची अपेक्षा धरू नका. अन्याय झाला तर शरद पवार, ठाकरे, राहुल गांधी, निर्भय बनो, डावे, युक्रांद, भरत पाटणकर आणि सह्या करणारे विचारवंत यांच्या बंगल्यावर जा ज्यांचे ऐकून मत जातदांडग्यांना देताय.
मत द्यायला सरंजामी आणि न्याय मिळवून द्यायला आंबेडकरवादी , नही चलेगा नही चलेगा !
0 टिप्पण्या