Top Post Ad

दुमजली बसचे संग्रहिका म्हणून कायमस्वरूपी जतन

मुंबई शहराला अखंडपणे वीजपुरवठा आणि परिवहन सेवा पुरवणाऱ्या बेस्टचा ७ ऑगस्ट १९४७ रोजी महापालिकेत समावेश करण्यात आला. त्याला यंदा ७८ वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिन ‘बेस्ट दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सध्याच्या पिढीला बेस्ट उपक्रमाचा जाज्वल्य इतिहास समजावा, यासाठी बेस्टतर्फे दरवर्षी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यंदाही बेस्ट उपक्रमाच्या आणिक आगारातील संग्रहालयात हे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. 
८ ते १० ऑगस्ट या दिवशी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने बेस्ट उपक्रमाचा इतिहास व वेध घेता येणार आहे. यंदाही या प्रदर्शनासोबतच बेस्ट उपक्रमाच्या जुन्या डिझेलवरील दुमजली बसचे संग्रहिका म्हणून कायमस्वरूपी जतन केले जाणार आहे. या संग्रहिकेची बेस्ट दिनी उद्घाटन करण्यात येणार आहे.

 एक दुमजली बस, संग्रहिका म्हणून बेस्टच्या संग्रहालयात कायमस्वरूपी ठेवली जाणार आहे. त्या बसमध्ये ध्वनीचित्रीद्वारे बेस्ट उपक्रमाच्या दुमजली बसचा इतिहास तसेच बेस्ट उपक्रमांने आतापर्यंत वापरलेल्या बस गाड्यांची छायाचित्रे संग्रहित करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे बेस्ट प्रकरणाच्या २७ बस आगारांच्या प्रतिकृती बनवण्यात आले असून हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असेल. बेस्ट उपक्रमांने गेल्या ९९ वर्षात वापरलेल्या एक मजली बस गाड्यांची छायाचित्रेही यंदाच्या आकर्षण असेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com