अध्यापनासारखे पवित्र कार्य शिक्षक करीत असतात, देशाचे भवितव्य घडविण्याचे कार्य शिक्षकाच्च्या हातून होत असते. तरीही शिक्षकांना दीर्घकाळ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) डयुटी बंधनकारक करून विद्यार्थी वर्गाचे अपरिमित नुकसान होत आहे . तसेच शिक्षकांनाही शारिरीक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. इतकेच नव्हे तर वर्गाध्यपनावर त्याचा विपरीत परिणाम होवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळत आहे. तसेच विद्यार्थ्यांचे अपरिमीत शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे एकंदरीत पालकवर्ग व संपूर्ण समाजात शिक्षकांची प्रतिमा मलीन होवून त्यांच्या विषयीचा आदरभावना कमी होत आहे. परिणामी समस्त शिक्षकवर्गात या मतदान डयुटीबाबत तीव्र रोष निर्माण झाला आहे. हया सर्व बाबींची दखल घेवून आणि विद्यार्थ्यांचे भविष्यात होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तसेच शिक्षकांना अशाप्रकारच्या अशैक्षणिक कामातून दिलासा देण्यासाठी मुंबई महानगरपालिका शिक्षक सेनेच्या वतीने न्यायालयात दाद मागण्यात आली. आणि न्यायालयाने याबाबत शिक्षकांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन निर्णय दिला असल्याची माहिती आज मुंबई महानगरपालिका शिक्षक सेनेचे सरचिटणीस हनमंत देसाई यांनी दिली.
मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन येथे प्रसार माध्यमांना माननीय उच्च न्यायालयाने या प्रकरणी विद्यार्थी हिताचा निर्णय दिला असल्याचे जाहिर करण्यात आले. मुंबई महानगरपालिका शिक्षक सेनेची बाजु ऐकून शिक्षकांना बी.एल.ओ. चे काम अशैक्षणिक असल्याने देण्यात येवू नये. त्याचप्रमाणे शालेय कामकाजाच्या वेळेत शिक्षकांना अशाप्रकारचे काम देण्यात येवू नये. तसेच निवडणूकीचे काम सुट्टीच्या कालावधीत दिल्यास त्याची भरपाई शिक्षकांना दयावयाची आहे व सेंट मेरी शाळेच्या प्रकरणात माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवला असल्याचे वकील इमान मुबारक शेख यांनी सांगितले. यावेळी त्यांचे सहकारी वकील जाजीब शहीद अझीज, अॅड. सना सिद्दीकी तसेच मुंबई महानगरपालिका शिक्षक सेनेचे अध्यक्ष के.पी.नाईक यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षक सेना मागील ४५ वर्षापासुन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील सर्वात मोठी व नावाजलेली शिक्षक संघटना आहे आणि आजच्या विजयाने शिक्षक सेनेच्या शिरपेचाल मानाचा तुरा रोवला आहे. आज न्यायदेवतेने आजचा विजय जो शिक्षक सेनेला मिळाला आहे. तो सर्व वरीष्ठ पदाधिकारी, कार्यकारणी पदाधिकारी व शिक्षक सेनेवर बांधिलकी असणाऱ्या शिक्षक सभासदांसाठी अधिक उत्साहवर्धक व प्रेरणादायी ठरणार आहे. अतिशय कमी कालावधीत हा दावा माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या पटलावर आणला आणि सर्व वकीलांच्या अथक प्रयत्नाने आम्हाला न्याय मिळाला. त्याबद्दल मुंबई महानगरपालिका शिक्षक सेना कोड क. १५ चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व शिक्षक सभासद व समस्त विद्यार्थी पालक वर्गाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. तसेच यापुढे येणा-या काळात शिक्षकांवरील होणा-या कोणत्याही अन्याया विरूद्ध संपूर्ण ताकदीनीशी लढण्याची व या शिक्षण व्यवस्थेचे पावित्र राखण्यासाठी सदैव काम करत राहू याची ग्वाही देसाई यांनी दिली.



0 टिप्पण्या