१८ जुलै हा अण्णा भाऊ साठे यांचा स्मृतिदिन आहे.त्यांच्या कार्याला आणि योगदानाला आदरांजली वाहण्यासाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.अण्णा भाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक, लोककवी आणि लेखक म्हणून ओळखले जातात.जी.के. एस. कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खडवली अंतर्गत श्रीमती कविता शिकतोडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एल. जाधव सर उपप्राचार्य श्री. प्रशांत तांदळे सर कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य.शफीक शेख सर यांनी प्रतिमेचे पूजन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका रिया बांगर मॅडम यांनी केले.तसेच प्राध्यापिका रसिका लोकरे मॅडम यांनी अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. अण्णाभाऊ साठे यांच्या " माझी मैना गावाकडं राहिली ,माझ्या जीवाची होतीय काहीली" या पोवाड्याचे सादरीकरण करून मानवंदना दिली.
अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे.महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमाभागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. अण्णा भाऊ साठे यांनी समाजातील गरीब, वंचित आणि दलित लोकांच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांनी आपल्या लेखणीतून समाजातील विषमतेवर आणि अत्याचारावर प्रकाश टाकला.त्यांनी अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला.आजचा दिवस अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करण्याचा दिवस आहे. त्यांच्या कार्याची आठवण ठेवून त्यांच्या विचारांचा प्रसार करणे, हेच त्यांना खरी आदरांजली ठरेल. असे विचार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
जी.के.एस.कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खडवली अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांच्यातर्फे अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.राष्ट्रगीतानी कार्यक्रमाची सांगता झाली.
....................................
साहित्य, कला आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमातून उपेक्षित, शोषित आणि वंचित घटकांच्या न्यायहक्कासाठी आयुष्यभर लढणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ५६ वा स्मृतीदिनानिमित्त रि.पा.ई.केंद्रीय कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या दक्षिण मुंबई जिल्हा कार्यालयात अत्यंत भावपूर्ण वातावरणात या कार्यक्रमाचे आयोजन आरपीआय दक्षिण मुंबईचे जिल्हा सरचिटणीस शिरीष चिखलकर यांनी केले होते. अण्णा भाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. कार्यक्रमाला विविध स्तरांतील मान्यवर आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने रि.पा.ई. दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष रहीमभाई, उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष व म्युनिसिपल मजदूर संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव, कार्यालयीन सचिव दादासाहेब जाधव, क्रिसभाई, तसेच अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन पत्रकार विभागाचे सरचिटणीस पत्रकार शिरीष वानखेडे, उपाध्यक्ष नंदू घोलप, सदस्य सुबोध शाक्यरत्न, सलीम सय्यद, नजमा खान यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होती.
कार्यक्रमात बोलताना शिरीष चिखलकर म्हणाले, “अण्णा भाऊ साठे हे केवळ लेखक नव्हते, तर ते वंचित समाजाचे प्रखर प्रवक्ते होते. त्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध लेखणीच्या माध्यमातून लढा दिला. त्यांच्या साहित्यातून आणि संघर्षातून सामान्य जनतेला आवाज मिळाला. ते खऱ्या अर्थाने परिवर्तनाचे वाहक होते.” त्यानंतर जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी आपल्या भाषणात अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजात समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याच्या संकल्पाची घोषणा केली. “अण्णा भाऊंची सामाजिक जाणीव, सडेतोड लिखाण आणि लोकशाहीर म्हणून त्यांचे योगदान आजच्या पिढीला मार्गदर्शन करणारे आहे. त्यांच्या विचारांचे अनुकरण हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे कामगार नेते प्रकाश जाधव म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी अण्णा भाऊंच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानाबद्दल आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांचे जीवनकार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. अण्णा भाऊ साठे यांचे कार्य आजही समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर प्रकाश टाकणारे आहे. अशा थोर समाजसुधारकाची पुण्यतिथी साजरी करणे म्हणजे फक्त श्रद्धांजली नव्हे, तर त्यांच्या विचारांच्या अनुकरणाची नवी सुरुवात होय.----------------------------------------------
अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त चेंबुर येथे कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे सचिव रविंद्र पवार, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, नगरसेविका आशा मराठे, विकास तांबे, बाळा सरोदे, सुनिता तुपसुंदर, सुदाम आवाडे, सरोजिनी सकटे आदी उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी समाजाला विषमतेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. पृथ्वी ही शेषाच्या फण्यावर उभारलेली नसून श्रमिकांच्या व कष्टकऱ्यांच्या तळहातावर उभारलेली आहे असे वास्तवादी विचार त्यांनी मांडले. आपल्या लेखनीतून व शाहिरीतून समाजाला जागवण्याचे काम केले. आजही अण्णाभाऊ साठे यांचे विचार तेवढेच महत्वाचे असून हे विचार तळागाळापर्यंत रुजवण्याची गरज आहे, अण्णाभाऊ साठे यांनी जीवनाचे वास्तवादी चित्रण दाखवण्याचे काम केले, महिला सक्षमिकरणाचा विचार त्यांनी मांडला. स्वतः शाळेत गेले नाहीत पण त्यांनी १२५ कथा व ४० काबंदऱ्या लिहिल्या, नाटक, लोकनाट्ये लावणी, पोवाडे यांचेही विपुल लेखन केले. वारणेचा वाघ, बारा गावचे पाणी, माकडीचा माळ, चिखलातील कमळ या कादंबऱ्यांवर चित्रपट निर्मिती करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील ते अग्रणी होते. अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असे मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड म्हणाल्या.
.jpg)


0 टिप्पण्या