Top Post Ad

बुद्ध लेण्यांचे विद्रुपीकरणाबाबत भारतीय पुरातत्व विभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष

बुध्द लेणी संवर्धन समिती आणि सर्व लेणी संवर्धक समूह महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्ममाने मुंबईतील आझाद मैदान येथे शनिवार दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता   एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन 
  बुद्ध लेण्यांवर होत असलेले अतिक्रमण आणि नेहमीच त्यांचे करण्यात येणार विद्रुपीकरण याबाबत भारतीय पुरातत्व विभाग जाणिवपूर्वक डोळेझाक करीत आहे. 84 हजार बुद्ध लेण्यां नष्ट करण्याचे प्रयत्न येथील व्यवस्थेने केले आणि आजही करत आहे. मात्र सत्य हे सत्य असते ते सुर्यप्रकाशाप्रमाणे आहे. कितीही नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी बुद्धरुप तेवढ्या गतीने उभारी घेत आहे. मात्र इथली व्यवस्था याकडे दुर्लक्ष करून त्याला वेगळे रूप देण्याचा प्रयत्न करीत आहे. या विरोधात जातीवादी भारतीय पुरातत्व विभागाला जाब विचारण्यासाठी  बुध्द लेणी संवर्धन समिती आणि सर्व लेणी संवर्धक समूह महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्ममाने सर्व लेणी संवर्धक, लेणी अभ्यासक तसेच पुरातन वास्तू प्रेमी आणि संपूर्ण बौद्धसमाज यांचे एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन मुंबईतील आझाद मैदान येथे शनिवार दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे.  भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष  भीमराव यशवंत आंबेडकर, गोपीचंद कांबळे, सनातन धम्मचे विलास खरात, तसेच अशोक तपासे, परमानंद गेडाम, महेंद्र शेगांवकर, धम्मपाल माशाळकर, संजय पाईकराव, अनिल जगताप, अशोक नगरे, अतुल भोसेकर, नंदकुमार कासारे, प्रथमेश देसाई, सुरज जगताप, मकरंद लंकेश्वर, सुर्यकांत ढवळे, प्रफुल्ल पुरळकर, सिद्धार्थ कसबे, सौरभ भोसले, पांडुरंग सरकटे, सजय आल्हाट, मिलिंद अहिरे, शैलेंद्र मोरे, महेंद्र कांबळे, प्रशांत कसबे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

* बुद्ध लेणींवरील अतिक्रमण केव्हा काढणार ?  * बेवारस बुद्ध लेणी - स्तूप ASI मध्ये केव्हा समाविष्ट करणार ? * बुद्ध लेणींचा विकासनिधी जातो कुठे ? * बुद्ध लेर्णीवर ASI कडून प्रशिक्षित गाईड कधी नियुक्त करणार ? * ASI चा भारतातून बुद्ध आणि बुद्ध वारसा संपवायचा कट तर नाही ना ? * अनेक बुद्ध लेणी संवर्धनापासून का वंचित आहेत ? उदा. ठाणाळे, नेणावली, शिरवळ, भंडारा, पाटण लेणी. * बौद्धांना लेणीवर वंदना घेण्यास मज्जाव आणि इतरांना मात्र आपापल्या उपासना करण्यास परवानगी असे का ? * बुद्ध पुरातन वास्तू अखेरच्या घटका का मोजत आहेत ? * बुद्ध लेणींवर पाणी, विज, रस्ते, स्वच्छतागृह आणि बसण्यासाठी बेंच या मूलभूत सुविधा कधी पुरवणार?  * लेणीं पासून १०० मिटर परिसरात होत असलेल्या अतिक्रमणांना आणि बांधकामांना जबाबदार कोण ?  * पुरातत्व खात्यामार्फत इतर पुरातन वास्तूंना त्यांच्या मूळ नावानेच नामफलक लावण्यात येतात, मात्र बुद्ध लेणीस बुद्ध लेणी असा नामफलक न लावता फक्त लेणी असा एकेरी उल्लेख असलेला नामफलक का लावण्यात येतो हा दुजाभाव कोणत्या द्वेशातून होतो ?  * भारत भूमीचा प्राचीन वैभवशाली धम्म वारसा असणाऱ्या बुद्ध लेण्यांचा इतिहास सांगणारा माहिती फलक लेणींवर का लावण्यात येत नाही ?आता वेळ आली आहे याबाबत A.S.I. ला जाब विचारण्याची..!

सेव बुद्धा केव अँड हेरिटेज लेणी संवर्धक, पुणे। समता सैनिक दल लेणी संवर्धक युनिट, मुंबई। सनातन धम्म, महाराष्ट्र संघमित्रा महिला लेणी संवर्धक, पिं. चिंचवड। केसनंद लेणी संवर्धन, पुणे। MBCPR लेणी संवर्धक, महाराष्ट्र । ABCPR लेणी संवर्धक, महाराष्ट्र । अशोका वॉरियर्स लेणी संवर्धक, मुंबई। एकजूट लेणी संवर्धक, मुंबई। कर्जत लेणी संवर्धक, कर्जत। प्रबुद्ध भारत फाउंडेशन, जुन्नर। दान पारमिता फाउंडेशन, नाशिक सह्याद्री लेणी संवर्धक, वाई। बौद्ध युवा जागृती परिषद, कराड। मावळ लेणी संवर्धक, मावळ । बुद्धभूमी प्रतिष्ठान, मावळ सम्यक बुद्ध विहार जनता वसाहत (पर्वती)। बुद्ध धम्म प्रचार समिती, मुंबई। भारतीय लोकसत्ताक संघटना, मुंबई। त्रिरत्न धम्म संस्कार वर्ग, मुंबई,  आम्ही आंबेडकरवादी संघटना, मुंबई। आनंद मंडळ दत्तवाडी, पुणे। युवा क्रांती संघटना, रायगड, सम्यक बुद्ध विहार जनता वसाहत (पर्वती)। बुद्ध धम्म प्रचार समिती, मुंबई।  भिम टायगर संघटना, महाराष्ट्र राज्य। प्रबुद्ध मैत्री संघ, मोशी। दिवांकुर बहुऊद्देशिय सामाजिक सेवा संस्था, महाराष्ट्र

बुद्ध लेणी ही आपली अस्मिता आहे. बुद्ध लेणी, पुरातन वारसा जतन आणि संवधीत होण्यासाठी हे आंदोलन आपण करीत आहोत. तरी उपस्थित राहून सदर आंदोलनास संपूर्ण बौद्ध जनतेने पाठिंबा द्यावा, तसेच या आंदोलनास सढळ हाताने धम्मदान करावे  असे आवाहन दीपक गायकवाड 8605695860 पुणे,/ प्रभाकर जोगदंड 7738635980 मुंबई,/ अनिल जाधव 7506223874 मुंबई,/ विजय खुडे 9158187383 पुणे,/  सारिश डोळस 9892114319 मुंबई,/ प्रशांत आगळे 8888309972 मावळ,/ अर्जुन काटे 8108814499 मुंबई,/ विवेक वाघमारे 8692950932 मुंबई,/ रोहित वाघमारे 9657514610 वाई,/ सारिका कांबळे 9766523994 पिं-चिंचवड,/ वसंत जावळे 8007541575 केसनंद,/ समाधान सोनवणे 9762886634 मावळ,/ विकास धनवे 9637379664 कर्जत,/  सुनील खरे 9370013953 नाशिक,/ कैलास कांबळे 7038564995 कराड,/ प्रशांत माळी 9152116983 मुंबई,/ गणेश वाव्हळ 7776984034 जुन्नर,/ अमित पाझारे 7719880364 मोशी,/ महेंद्र कांबळे, 9371046425 पुणे,/ दादासाहेब आगळे 8888309972 मावळ,/ रविंद्र सावंत 9321214805 मुंबई


गड किल्ल्यांच संवर्धन होणारा बौद्ध वास्तू आणि लेण्यांचं काय..
महाराष्ट्रातील तीनशे साडेतीनशे वर्षांपूर्वीचे  छत्रपती शिवरायांच्या काळातील  11 गड किल्ले जागतिक पर्यटन अर्थात युनोस्को च्या यादीमध्ये घेतले गेले  निश्चित ही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे, परंतु आमचा प्रश्न हा आहे कि.. महाराष्ट्रातील आणि देशभरातील दोन अडीच हजार वर्षांपूर्वीच्या अति प्राचीन बौद्ध लेण्या आजही विद्रूप अवस्थेत  मोडक्या तोडक्यात आवस्थेत पडलेल्या आहेत काय त्या संवर्धित व्हाव्यात आणि आमचा वारसा जगाला कळवा असं धोरणकर्तै आणि सरकारला वाटत नाही का.. दोन अडीच हजार वर्षांपूर्वीचा मूळ वारसा  आपल्याला जगासमोर आणायचा नाही का.. याच विषयाला धरून सनातन धम्म डॉ विलास खरात यांच्या नेतृत्वामध्ये देशभर बौध्द विरासत बचाओ अभियाना अंतर्गत  संपूर्ण देशभर आणि 365 दिवस बौद्ध धम्म जागर अभियान सुरू करत आहे या अखंड जम्बुदीपात बौध्द वारशाचे पुनश्च गतवैभव मिळवून देण्यासाठी व भारताला बुद्धमय करण्याच्या मोहिमेच्या अंतर्गत देशभर हे अभियान राबविले जाणार आहे आपण या महान कार्यात नक्कीच सहभागी व्हावे -- प्रा. अमोल सोनवणे, प्रचारक सनातन धम्म 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com