हिंदी भाषेची सक्ती करून भाजप हा महाराष्ट्र द्रोही पक्ष आहे हे सिद्ध झाले आहे. शेकाप, माकप, शिवसेना, मनसे व मराठी भाषा प्रेमी यांनी सर्वांनी एकत्र येऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पद्धतीने रस्त्यावर उतरून याला विरोध करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा कारभार मराठी भाषेत केला. हे केंद्र आणि राज्य सरकारला माहित नाही म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप आमदार आणि खासदार यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे विचार कळले नाही. म्हणून तर महाराष्ट्र वर भाजपचे प्रेम नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ती केवळ इतर भारतीय भाषांप्रमाणेच एक राज्यभाषा असून हिंदी भाषा सक्ती करणे अयोग्य आहे. महाराष्ट्राची राज्य भाषा मराठी मग एक फुल दोन हाफ सरकार जबरदस्तीने हिंदी सक्ती का करत आहे ? याचा प्रत्येक मराठी माणसाने जाब विचारणे गरजेचे आहे. पहिलीपासून हिंदी शिकवावी असं राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठे म्हटलं आहे? भाजप आणि देवेंद्र फडणवीस जी खोटे बोलत आहेत.
फडणवीस सरकारने राज्य मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या मराठी आणि हिंदी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी ही तिसरी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय मागे घेतला होता. मात्र त्यानंतर अनिवार्य शब्द काढून इच्छुक विद्यार्थ्यांसाठी भाषा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जयंत पाटील यांनी ताबडतोब विरोध दर्शवला आहे. हिंदीची सक्ती करताना अन्य कोणालाही विचारात घेतलेले नाही, ही तर सरळ सरळ हुकूमशाहीच झाली असा घणाघात पाटील यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्रव्यापी तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे शेकापच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहिर करण्यात आले आहे. भाजप च्या हिंदी भाषा सक्ती विरोधात त्यांची हुकूमशाही थांबवण्यासाठी लवकरात लवकर शेकाप, माकप, शिवसेना, मनसे, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, सार्वजनिक मित्र मंडळ व मराठी भाषा प्रेमी यांनी सर्वांनी एकत्र येऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळच्या पद्धतीने रस्त्यावर उतरून लढा लढला पाहिजे. भाषावार प्रांत रचना आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीकरिता, संयुक्त महाराष्ट्र समितीने दिलेल्या अविस्मरणीय संघर्षात, शेतकरी कामगार पक्ष अग्रभागी राहिला असून, मराठी ही आमची मातृभाषा तर आहेच परंतु ती महाराष्ट्राची राजभाषा आणि महाराष्ट्राची अस्मिता आहे, असे प्रतिपादन पाटील यांनी केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शेकापचा फार मोठा इतिहास आहे म्हणून हिंदीची सक्ती शेतकरी कामगार पक्ष खपवून घेणार नसल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.महाराष्ट्राच्या जनतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी १००% जबरदस्तीने हिंदी सक्ती करून शेंडी लावण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात की नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप, RSS, गुजरात चे गुलाम आहात? असा सवाल पाटील यांनी केला. तुम्हाला महाराष्ट्र विषयी, मराठी भाषा, मराठी माणसा विषयी प्रेम नाही आणि "मराठी चा अभिमान नाही आहे असे दिसते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदी भाषा सक्ती विरोधात शिवसेना वर्धापन दिनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील, अशी अपेक्षा होती पण ते ही गप्प. शिवसेनेकडे शिक्षणमंत्री पद आणि हि जबाबदारी दादा भुसे यांच्याकडे, पण त्यांनी हिंदी सक्तीचा निर्णय कसा लागू करून दिला? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक एवढा कमजोर कसा असू शकतो? आज सन्मानीय बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी एकनाथ शिंदे आणि दादा भुसे यांचा ठाकरे स्टाईल मध्ये चिरफाड करून चांगलाच समाचार घेतला असता.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे ही हिंदी भाषा शक्ती त्यांना मान्य आहे म्हणून ते गप्प आहेत. त्यांना फक्त सत्ता आणि सत्तेत राहून फक्त पैसा कशा मिळवायचा हाच त्यांचा विचार आहे. मराठी भाषा आणि संस्कृती वरील हल्ला परतवून लावण्यासाठी मराठी चित्रपट नाटक चे कलाकार, दिग्दर्शक, निर्माते हिंदी भाषा सक्तीच्या बाबतीत गप्प का? हिंदी भाषा सक्ती विरोधात कधी बोलणार ? मराठी भाषा ही आपली आई आहे आणि संस्कृती आहे, या वाक्याचा अर्थ आहे की मराठी भाषा आपल्यासाठी आईसमान आहे. मराठी आपली मातृभाषा आहे आणि आपण तिच्यातच वाढलो, बोललो, आणि विचार करायला शिकलो. त्यामुळे, मराठी भाषेला आईप्रमाणे आदर आणि प्रेम देणे महत्वाचे आहे. मराठी भाषा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे. ती आपली ओळख आहे आणि आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. मराठी भाषेमुळे आपण महाराष्ट्राची ओळख जगाला करून देतो हे छत्रपती शिवरायांनी दाखवून दिलं आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे लबाडी करून आपली मराठी भाषा आणि संस्कृती हिंदी भाषेची सक्ती करून संपवत आहेत. म्हणून त्यांच्या हुकुमशाही च्या विरोधात प्रत्येक मराठी माणसाने लढण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे.

0 टिप्पण्या