गेल्या आठवड्यात पावसाच्या हलक्याशा सरी बरसल्या . वैशाखाच्या वणाव्याने घामाघूम झालेल्या मुंबईकरांना पावसाने थोडासा दिलासा मिळाला.मात्र त्याच वेळी घाटकोपर रेल्वे स्थानकासमोर असलेली अरविंद विला ही .जुनी इमारत पहाटे अडीच तीनच्या सुमारास कोसळली. त्यावेळी गस्तीवर असलेले पोलिस उप निरीक्षक नवनाथ रानवट आणि शरद शेटे आपल्या सवंगड्यांसह घटना स्थळी रवाना झाले आणि जीवाची पर्वा न करता त्यांनी तेथे झोपलेले कामगार आणि सुरक्षा रक्षक यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. यावेळी त्यांनी ना अग्निशामक दलाचे वाट पाहिली ना पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राची .ही सर्व घटना २७ में रोजी पहाटे अडीच तीनच्या सुमारास घडली आहे.पण घाटकोपरच्या जांबाज आणि धाडसी पोलीसांचे कोणीही कौतुक केले नाही .जनतेच्या जीवांसाठी आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या पोलिसाला हवी असते ती शाब्बासकीची एक थाप आणि आपुलकीची भावना !
इतकीच माफक अपेक्षा करत असतो तो मुंबईचा फौजदार . ही बाब लक्षात घेऊन घाटकोपर परिसरातील सर्व पत्रकार. व समाजसेवक यांनी नुकतीच त्या धाडसी पोलिसांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले. घाटकोपर रेल्वेस्टेशन लगत असलेल्या पोलिस बीट येथे हा कर्तव्य गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय गिरी मुकुंद लांडगे ,सकाळचे वार्ताहर निलेश मोरे. सेवानिवृत्त शिक्षक व पत्रकार हरिश्चंद्र पाठक यांच्या सह घाटकोपर मधील सुजाण नागरिक उपस्थित होते. पोलिसांना एक नवी प्रेरणा आणि उभारी देण्याचे महत्कार्य घाटकोपर मधील जागरूक नागरिकांनी केलं आहे .अशा शब्दांत उपनिरीक्षक शरद शेटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

0 टिप्पण्या