उपनगरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, लोकल ट्रेन सेवांमध्ये सातत्याने वाढ करणे आवश्यक आहे परंतु तसे होत नाही, हार्बर लाईनवरील सुमारे ९ कोच गाड्या १२ कोच गाड्यांमध्ये आणि पूर्व आणि पश्चिम उपनगरातील सुमारे १२ कोच गाड्या १५ कोच गाड्यांमध्ये रूपांतरित करण्याव्यतिरिक्त, रेल्वे प्रशासनाने गेल्या कित्येक वर्षांत मुंबई उपनगरीय सेवांच्या विस्तारासाठी फारसे काहीही केलेले नाही. उपनगरीय रेल्वे सेवेत सतत सुधारणा करून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रशासनावर दबाव आणण्यातही राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मुंबईतील कामगार वर्गाला सतत दूरच्या उपनगरांमध्ये ढकलले जात आहे आणि आपल्याला दररोज लोकल ट्रेन नावाच्या मृत्यूच्या सापळ्ळ्याला सामोरे जावे लागते. म्हणून उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या अमानुष स्थितीबद्दल रेल्वे आणि राज्य सरकारचे निष्काळजीपणा थांबवून लोकल ट्रेन सेवा सुधारण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली.
- मुंब्रा दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना पुरेशी भरपाई देण्यात यावी.
- सर्व गाड्या १५ डब्यांच्या असाव्यात. ज्या स्थानकांवर १५ डव्यांच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्मची लांबी अपुरी आहे, त्या स्थानकांवर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम तात्काळ हाती घ्यावे.
- पूर्व आणि पश्चिम मार्गावर प्लॅटफॉर्मच्या लांबीचा प्रश्न नाही, म्हणून तेथील सर्व गाड्या त्वरित १५ डब्यांच्या कराव्यात.
- सिग्नलिंग सिस्टीममध्ये मोठ्या सुधारणांची आवश्यकता आहे जेणेकरून दर दोन मिनिटांनी एका दिशेने गाड्यांमध्ये रूपांतरित कराव्यात.
- एमआरव्हीसीच्या विविध प्रकल्पांमधील विलंब दूर केला पाहिजे, रेल्वे सेवा आणि स्थानक सुविधांचा जलद विस्तार करण्यासाठी आवश्यक असलेले नवीन प्रकल्प एमआरव्हीसीने त्वरित हाती घ्यावेत.
- अशा मागण्यांचे पत्रक यावेळी रेल्वे प्रशासनाला देण्यात आले. .
रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारचा निष्काळजीपणा थांबलाच पाहिजे!
लोकल ट्रेनमध्ये सुरक्षित आणि सन्मानाने प्रवास करणे हा आपला अधिकार आहे।

0 टिप्पण्या