मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु झाल्यापासून ऐनकेन प्रकरणाने ती चर्चेत आहे. कधी वेळेवर पैसे न मिळाल्यामुळे तर कधी इतर खात्यांचा निधी या योजनेकरिता वापरल्याने तर कधी बोगस बहिणी म्हणून लाखो बहिणींची नावे बाद केल्यामुळे अशा अनेक प्रकारे ही योजना सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. त्यातच आता या योजनेचे फार्म भरलेल्या अंगणवाडी मदतनीसांना शासनाने प्रोत्साहन भत्ताच दिला नाही. यामुळे हजारो बहिणींनी आज आझाद मैदानात आंदोलन केले. शासनाने या बहिणींकडून अर्थात मदतनीसांकडून या योजनेचे काम करून घेतले मात्र त्याची प्रोत्साहन राशी देण्याची वेळ आली तेव्हा आम्ही तुम्हाला हे काम सांगितलेच नव्हते असा सूर लावण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील हजारो मदतनीस रोष व्यक्त करीत आहे. प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मदतनीसांवर दडपशाही करुन, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे फार्म भरुन घेतले आहे, परंतू त्याचे प्रोत्साहन राशी देण्यात आले नाही. त्यांना प्रोत्साहन राशी देण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघच्या वतीने मुंबई जिल्हयातील मदतनीसानी आझाद मैदानात निदर्शने केली. दिनांक ०४.१०.२०२४ च्या शासन निर्णयानुसार, अंगणवाडी सेविका/मदतनीसांना दरमहा २००० ते १००० पर्यंत प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश आहे. ९ महीने होऊन सुध्दा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्त्याची राशी मिळाली नाही. ती राशी विना विलंब अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात यावी, अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. अंगणवाडी सेविकांना, एप्रिल २०२४ पासून चे सिम रिचार्ज ची निधी देण्यात यावी, टी. एच. आर. वाटप करताना फेस रिकगरेशनचे दडपशाही थांबवण्यात यावी, सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांना ग्रज्यूटी देण्यात यावी या मागण्यासाठी मुंबई, पालघर ठाणे व रायगड जिल्ह्वगातील अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने आज आझाद मैदानात उपस्थित होते.


0 टिप्पण्या