Top Post Ad

उघड कवाडे देवा आता...

सर सेनानी लॉंगमार्च प्रणेते जोगेंद्र कवाडे यांच्या मुलाने केलेले माधव गोळवळकर गुरूजी यांच्या सन्मानाचे, स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचे बॅनर सध्या चर्चेत आहे.. अडीच हजार वर्षे कोट्यवधी दलित, शुद्रातीती शुद्र गुलामीच्या नरकात अमानुष खितपत कसे राहिले असतील याचं उत्तर ही पोस्ट आहे. आम्ही गुलाम म्हणून जगण्यास कसे लायक आहोत असे सांगणारा हा ढळढळीत पुरावा आहे....

सध्या आंबेडकरी म्हणवणाऱ्या चळवळीचे तिन प्रवाह आहेत. एक प्रवाह थेट मनुवाद्यांशी हस्तांदोलन करतो आहे, एक पाठीमागून छुपा हातमिळवणी करतो आहे. दोघांनी हाराकिरी केली आहे. एक जर्जर पण मनुवाद्यांशी लढतो आहे. अडीच हजार वर्षाची गुलामी तिचा अन्वयार्थ लावून महासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नेस्तनाबूत केली. या अडीच हजार वर्षाच्या गुलामीच्या नरकातून दलित बहुजनांना शुद्रातीशुद्रांना माणूस म्हणून जगण्याची लायकी प्राप्त करून दिली आणि त्याचे नालायक वारसदार आज मनुवाद्यांच्याशी हात मिळवणी करून संघर्षातून मिळवलेला सन्मान मातीत मिळवण्याचे काम करत आहेत.
महासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शुद्रातीशुद्रांना गुलाम कसे केले, या आर्ष काळोखी भूतकाळाचा, शतकांचा गाळ उपसला. बेड्यांचा, साखळदंडांच्या मागिल कारणांचा शोध घेतला.. मनुवादी व्युहरचना आपल्या प्रज्ञेच्या बळावर भेदली... आणि आज आम्ही त्याचेच बेजबाबदार वारसदार आमच्या हातांनीच आमच्या गळ्यात गुलामीचे मडके अडकवून घेण्यासाठी उतावीळ झालेलो आहोत... आम्ही आमचीच घरे गावकुसाबाहेर नेण्यासाठी हाकारे देत आहोत...
ज्या गोळवळकर गुरूजींनी चातुर्वर्ण्य व्यवस्था नैसर्गिक आहे, विषमता स्वाभाविक आहे अशी मांडणी केली त्याचे भोई कवाडे सारखे अनेक भोई आता पुढे येत आहेत... नागपूर येथे झालेल्या महिला अधिवेशनात महासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, भाकरी पेक्षाही मला स्वाभिमान प्यारा आहे. कामाठीपुऱ्यातील देहविक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी झोडपून काढण्याचा इशारा दिला होता. ते म्हणाले होते कष्ट न करता देहविक्री करून मटन पाव खाणाऱ्या महिलांना चारित्र्यवान स्री काडीचीही किंमत देत नाही. कारण त्या स्त्रीला चारित्र्य, शील स्वाभिमान याचा अर्थ कळालेला आहे. राजकारणामध्ये असे चरित्रहीन लोक आता मोठ्या प्रमाणात दिसत आहेत
आईला धंद्याला लावून, बापाला दरवाज्यात बसवून हा पैसा मोजायला गल्ल्यावर बसला आहे... !
हेच यांचे राजकीय चारित्र्य आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती रथाचे चाक आसासहीत फिरवले होते ते अधिक पुढे नेण्याची गरज असतांना मनुवाद्यांशी हातमिळवणी करून प्रतिक्रांतीला हातभार लावणे सुरू आहे...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तत्वज्ञानामुळे व ज्यांनी हे तत्वज्ञान अवगत केले आहे ते प्रत्येक राजकीय कृतिचा आंबेडकरी अन्वयार्थ लावू शकतात. आम्हाला प्रज्ञा, शिल, करुणेचा चिकित्सक डोळा मिळालेला आहे. प्रत्येक थोतांडाचे थोबाड फोडण्याचे बळ आंबेडकरी जनतेत आहे.
संविधानाच्या प्रयोगशाळेत प्रत्येक राजकीय भुमिकेची चिकित्सा होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, समग्र क्रांती आम्हीच करू कारण आम्हीच सर्वहारा आहोत. गमावण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. मात्र बाबासाहेबांच्या कृपेमुळे या सर्वहारा वर्गातील काही घटक, काही मुठभर मध्यम व उच्च मध्यम वर्गात गेले आहेत आणि हाच हाराकरी करणारा वर्ग आहे. तोच डीजेवर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतो आहे. आज तथाकथित आंबेडकरी चळवळ या मध्यम व उच्च मध्यम वर्गाच्या हातात आहे आणि तो या मनुवादी व्यवस्थेचा लाभार्थी आहे. त्यामुळे तो समग्र क्रांती करू शकत नाही, क्रांती लढ्यात सहभागी होऊ शकत नाही...
कवाडे यांच्या खांद्यावर वर्षोनुवर्षे सतत एक शाल असते ती शाल आता नाग नदीच्या पाण्यात स्वच्छ धुण्याची गरज आहे.. त्यांचा हा चिरंजीव त्याचाही मेंदू धुऊन शुध्द करावा लागणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्ताचे पाणी करून आम्हाला हे माणसाचे जगणे दिले. आपली पोटची मुलं मातीत घातली, माता रमाईला कुपोषणानं अवघ्या पस्तिसाव्या वर्षात मरावं लागलं...
हे कृतघ्न तथाकथित नेते जर स्वार्थासाठी आंबेडकरी जनतेला मनुवादी कसायाच्या दावणीला बांधत असतील, आंबेडकरी जनतेने आता स्वतःच भिमा कोरेगाव व्हावे...
महामानव बाबासाहेब म्हणाले होते, क्रांतिचा हा रथ मी इथपर्यंत आणला आहे.. तो पुढे नेता आला नाही तर मागे तरी नेऊ नका....
आंबेडकरी जनतेने आता भुमिका घेऊन अशी बिघडलेली कवाडे उखडून टाकली पाहिजेत....
राजानंद सुरडकर यांचे फेसबुक वालवरुन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com