Top Post Ad

ऑटोरिक्षा प्रवासी आणि चालकांच्या सेवेत आता यात्री मित्र मोबाईल अॅप

 मुंबई आणि ठाण्यातील ऑटोरिक्षा चालकांनाच नव्हे तर प्रवाशांनाही उपयुक्त  आणि फायदेशीर ठरवू शकेल, अशा 'यात्री मित्र' ह्या ऍपचे लोकार्पण आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे प्रसार माध्यमांच्यासह करण्यात आले.  सेवा सारथी ऑटोरिक्षा टॅक्सी व ट्रान्सपोर्ट युनियनचे सरचिटणीस डी.एम. गोसावी यांनी या अॅपच्या उपयुक्ततेबाबत पत्रकारांना माहिती दिली. यावेळी  नरेंद्र राव (संचालक, मेटाडोन लॅब्स प्रा. लि.)  प्रदीप मेनन (अध्यक्ष, सेवा सारथी ऑटोरिक्षा टॅक्सी व ट्रान्सपोर्ट युनियन)  प्रणव राव (संचालक, मेटाझेन लॅब्स प्रा. लि.) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

३१ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये २,५१,४६१ आणि संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात एकूण ५५५९८६ ऑटोरिक्षा धावतात. एकट्या मुंबईमध्ये दररोज १० लाखांहून अधिक प्रवासी ऑटोरिक्षाने प्रवास करतात. दिवस - रात्र ऑटोरिक्षा चालक इथे प्रवाशांना सेवा देत असतात. हे ऑटोरिक्षा चालक शासनाने ठरवून दिलेल्या भाडे दरानुसार प्रवाशांकडून भाडे आकारतात. काही टॅक्सी कंपन्यांनी मधल्या काळात ऑटोरिक्षा टॅक्सी चालकांना प्रलोभनं दाखवून प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे आकारून सेवा पुरविण्याच्या नावाखाली लूट चालविली होती आणि ती सुरूच आहे. अशा प्रकारच्या भाडे आकारणीला कायद्याने परवानगी नाही. परंतु, ती बिनदिक्कत सुरूच आहे. 

अशातच मुंबई आणि ठाण्यातील ऑटोरिक्षा चालकांसोबत आम्ही प्रत्यक्ष बोललो तेव्हा त्यांनी मीटर प्रमाणे देय भाडे एखाद्या मोबाईल एप्लिकेशनच्या माध्यमातून निर्माण केल्यास प्रवाशांना आणि ऑटोरिक्षा चालकांना देखील फायदेशीर ठरवू शकेल, असे सुचवले. त्याच आधारावर मेटाझेन लॅब्स प्रा. लि. ह्या कंपनीने अभ्यासपूर्वक  'यात्री मित्र' हे ऍप विकसित केले आहे..Metazen Labs Private लिमिटेड ही कंपनी Kaizen Infotech Solutions Pvt Ltd ह्या कंपनीची सिस्टर कंपनी आहे. याच कंपनीने यापूर्वी भारत सरकारच्या आयकर विभागासाठी, मुंबई पोर्ट ट्रस्ट, ठाणे महानगरपालिका, रोटरी इंटरनॅशनल यांसाठी मोबाइल अॅप्स विकसित केली आहेत. सेवा सारथी ऑटोरिक्षा टॅक्सी व ट्रान्सपोर्ट युनियनमार्फत 'यात्री मित्र' ऍपचा प्रचार व प्रसार करणार आहे.  अशी माहीती गोसावी यांनी दिली. 

सेवा सारथी आणि मेटाझेन कडून सुरुवातीच्याटप्प्यात मुंबई आणि ठाण्यातील नोंदणीकृत रिक्षाचालकांना यात्री मित्र ऍप्प बद्दल योग्य तेप्रशिक्षण देण्यात येईल. तसेच हे अॅप रोज वापरणाऱ्या चालकांना वैयक्तिक अपघाती विमा कवच देण्यात येईल, यासाठी कोणतेही कमिशन नाही संपूर्ण भाडे रिक्षाचालकाला मिळणार तसेच त्वरित पेमेंट मिळेल. त्याचसोबत प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी ऍप्पच्या माध्यमातून ऑटोरिक्षा उपलब्ध होईल. याकरिता  मीटरमध्ये दाखवलेलेच भाडे द्यावे लागेल. या अॅपकरिता कोणतेही सर्ज प्रायसिंग नाही. शिवाय प्रवाशांच्या इच्छेनुसार कोठेही थांबा.  यासाठी चालक व प्रवासी नोंदणी २६ जून २०२५ पासून सुरू झाली आहे. व अॅपचा वापर १५ जुलै २०२५ पासून सुरू करता येईल. 

यासाठी रिक्षाचालकांकडून रोजच्या वापरासाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल. कोणतेही अतिरिक्त कमिशन आकारले जाणार नाही. प्रवाशांनी फक्त मीटर प्रमाणे चालकांना थेट पैसे द्यावेत. चालक कॅश किंवा कोणत्याही UPI पर्यायाने पैसे स्वीकारू शकतात. ही सेवा सुरुवातीला मुंबई आणि ठाण्यात सुरू करण्यात येत आहे नंतर मुंबई महानगर क्षेत्र तसेच महाराष्ट्रभर विस्तारित केली जाईल. "Yatri Mitra Driver" अॅप Google Play Store वर उपलब्ध आहे, आणि "Yatri Mitra Passenger)" अॅप Google Play Store व App Store दोन्हीवर उपलब्ध आहे. तसेच www.sevasarathi.org ह्या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. सेवा सारथी आणि यात्री मित्र दोन्ही संस्थांकडून सर्व नागरिकांना व ऑटोरिक्षा चालकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी "यात्री मित्र" अॅप जरूर त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावे व ह्या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन नरेंद्र राव यांनी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com