Top Post Ad

मुंबईकर रेल्वे प्रवासी असेच मरत राहणार का?

प्रवाशांनी आणि प्रवासी संघटनांनी विचारलेल्या एकही प्रश्नाचं उत्तर न देता हा अपघात प्रवाशांच्या बॅग मुळे झाला असा निष्कर्ष काढून रेल्वे प्रशासनाच्या वतीने मुंब्रा अपघात प्रकरण दाबण्यात येत आहे.  रेल्वे प्रशासन म्हणते की, प्रवाशांच्या बॅगा एकमेकींमध्ये अडकल्याने हा अपघात झाला. मग रेल्वे प्रशासनाला असा प्रश्न आहे की, एक बॅग लागल्यामुळे रेल्वेचा डबा हलतो का?  बॅगमुळे इतका मोठा धक्का बसतो का की प्रवासी खाली पडतील? बॅग जर अपघातस्थळी सापडली असेल, तर इतर वस्त्र फाटून प्रवासी मृत्युमुखी पडले, पण बॅग सुरक्षित राहिली?  लोकल 8:58 वा ठाणे येथे पोहोचणे अपेक्षित होते, पण 9:05 ते 9:25 दरम्यान अपघात झाला. उशिरामुळे गाडी वेगात होती, प्रवाशांची गर्दी एकाच बाजूला होती. वळण आणि CANT मुळे लोकल डावीकडे झुकली आणि समोरून येणाऱ्या ट्रेनचा धक्का लागला. असे स्पष्ट मत रेल्वे प्रवाशी संघटनेचे सिद्धेश देसाई यांनी व्यक्त केले आहे.  

मागील 6 महिन्यांपासून लोकल रेल्वे अपघाताची मालिका वाढली आहे.  काही महिनेपूर्वी लोकलने प्लॅटफॉर्मला घासले होते. रेल्वे प्रशासन अपघातानंतरही चौकशी करत नाही. मोठ्या गाड्यांसाठी चौकशी असते, पण मुंबईच्या अपघातांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोपही प्रवासी संघटना करीत आहेत  तसेच  पूर्वसूचना असूनही दुर्लक्ष का करण्यात येते? गाड्यांचा वेग कमी का केला गेला नाही? CCTV फुटेज मिळाले नाही, म्हणून अपघातग्रस्तांची साक्ष महत्त्वाची ठरते आणि अनेक प्रवाशांनी ट्रेन घासल्याची आणि मोठा आवाज झाल्याचे सांगितले आहे. मग रेल्वे प्रशासन त्यांना खोटे ठरवत आहे. कारण जवाबदारी टाळायची आहे?  . यापुढेही अपघातांची मालिका सुरूच आहे, नुकताच कुर्ला येथील ट्रेनवर पडलेल्या OHE मध्ये मोठा अपघात होता होता वाचला. संपुर्ण हाय व्होल्टेज वायर ट्रेन वर कोसळते पण कोणावरही कारवाई होत नाही? याचा निषेध करीत रेल्वे प्रवासी संघटनांनी मुंबईकर रेल्वे प्रवासी असेच मरत राहणार का? असा सवाल रेल्वे प्रशासनाला केला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com